ganesh chaturthi

Shri Kshetra Pandharpur श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर

Updated: शनिवार, 5 जुलै 2025 (13:04 IST)
वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते, असे सांगितले जाते. मुख्य चार वार्‍या असतात ज्यात चैत्री यात्रा असते ज्यात पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. दुसरी आषाढी यात्रा जी पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. तिसरी कार्तिकी यात्रा जी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. आणि चौथी माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात.

पंढरपूर कसे जावे?
पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात असून पंढरपूर हे शहर महाराष्ट्रातील अनेक शहरांना रस्त्यांनी जोडलेले आहे. तसेच पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शनने जोडलेले आहे. मिरज - पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख रेल्वे मुंबई- पंढरपूर, मिरज -पंढरपूर, लातुर - पंढरपूर, उस्मानाबाद - पंढरपूर अशा आहे. पंढरपूर पासून जवळ असणारी विमानतळे सोलापूर- 75 कि.मी. आणि पुणे -210 कि.मी. अंतरावर आहे.<>

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

रक्षाबंधन वीकेंडसाठी पुण्याजवळील सर्वोत्तम १ दिवसीय ट्रिप ठिकाणे

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

Princess of Hill Stations "टेकड्यांची राणी" कोडाईकनाल तामिळनाडू

पुढील लेख
Show comments