suvichar

नयनरम्य - ताम्हिणी घाट

Updated: गुरूवार, 28 जुलै 2016 (17:48 IST)
 
ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोड्या चढावरून पुढे गेले की, एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरश: कोसळत खाली येतात. तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक इथे गर्दी करतात.
 
घाटातल्या वळणावर - वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहत असतात. पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकड्यांच्या या भल्या - थोरल्या भिंतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. ताम्हिणी घाट त्याच्या वळण वाटातून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. पावसाळ्यामध्ये खूप धमाल, मज्जा, मस्ती करायची असेल तर तुम्ही ताम्हिणी घाट येथे एक दिवसाची पावसाळी सहल करू शकता. 
 
कसे जाल :- मुंबईपासून अंतर १४० किमी आहे. पुण्यापासून पौड रस्त्यापासून ९३ किमी अंतरावर आहे. मुंबईकडून येताना मुंबई - पुणे महामार्गावर लोणावळा इथे बाहेर पडावे लागते. लोणावळ्यापासून ऑबी व्हाली रस्त्याने ताम्हीनिकडे जाता येते .
 
-चारुशिला बोधे 

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

पंकज त्रिपाठीच्या 'ओह माय डॉग' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, चित्रपट आता या तारखेला प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुंबईत एक नवीन 'घर' विकत घेतले आहे, त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

ज्योतीर्मयी नायकने इंडियन आयडॉल १६ चे विजेतेपद पटकावले

एकलिंगजी मंदिर उदयपुर

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हाचा व्हिडिओ व्हायरल, Gen Z ची माफी मागितली

पुढील लेख
Show comments