Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपची पहिली यादी आठवडयाअखेर

Updated: मंगळवार, 8 सप्टेंबर 2009 (18:03 IST)
पुढील महिन्यात होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी या आठवडयाच्या अखेरीस जाहीर करणार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले आहेत.

पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात शिवसेना भाजप युतीमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाल्यानंतर भाजपने उमेदवार यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५६ नावांवर सहमती झाली आहे, येत्या दोन दिवसात उर्वरित नावांवर चर्चा निर्णय घेण्यात येईल. या आठवडयाच्या अखेरी पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पहिल्या उमेदवारी यादीला मान्यता देऊन ती जाहीर करण्यात येणार असल्याचे जावडेकर म्हणाले.

युतीची १७१ अणि ११७ या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर सहमती असून निवडणुकीच्या दृष्टीने उभय पक्ष कामाला लागले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ३८ टक्के मते मिळाली. युतीला ३५.५ टक्के मते मिळाली. म्हणजेच टक्केवारीतील फरक फक्त अडीच टक्क्यांचा आहे. येत्या निवडणुकीत हा फरक भरुन काढण्याच्या तयारीने युती कामाला लागली आहे, असे ते म्हणाले.

राज्यात नव्याने उदयाला आलेली रिपाई - डावी आघाडी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची मते घटविणाणर असून त्याचा फायदा युतीलाच होणार असल्याचा दावाही जावडेकर यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी युतीला फटका बसल्याचे लक्षात घेता उभय पक्ष याबाबत योग्य व्यूहरचना आखत आहेत, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

Show comments