गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (16:03 IST)

साप्ताहिक राशीफल 4 ते 10 डिसेंबर 2016

मेष : या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदात राहणार आहे. या वेळेस तुमच्या मनात जोष आणि उत्साह राहणार आहे पण कुठल्याही कार्यात घाईगडबड करू नका. तुमच्या हलगर्जीपणे बर्‍याच गोष्टी बिघडू शकतात, त्याची काळजी घ्या. वडील, समाजातील प्रभावशाली व्यक्ती, उच्च पदाधिकारी किंवा इतर व्यक्तींशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. यात तुमचे अहं पुढे येऊ देऊ नका.
  
वृषभ : या आठवड्यात तुम्ही मौज मजा आणि मनोरंजनाच्या साधनांवर खर्च कराल. या आठवड्यात तुम्हाला संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. प्रेम प्रकरणात भावनात्मक संबंधांचे वाईट परिणाम येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. या वेळेस तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष्य देण्याची गरज आहे. वैवाहिक संबंध सामान्य राहतील.
 
मिथुन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे अडकलेले कार्य पूर्ण होतील. तुम्ही नवीन योजना आखण्याची तयारीत असाल. जमीन, घर, प्लाट इत्यादींशी निगडित कार्य यशस्वीरीत्या पार पडतील. या आठवड्यात तुमचे लोन पास होण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या घरात शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे.
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे भाग्य तुमचा साथ देणार आहे. या आठवड्यात तुम्ही फारच कमी प्रयत्न केले तरी तुम्हाला त्याचे भरपूर यश मिळणार आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक व्यक्तीसोबत जर तुमचे मतभेद सुरू असतील तर या आठवड्यात ते संपुष्टात येतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे.
 
सिंह : या आठवड्यात तुमच्या जीवनात बरेच चढ उतार येणार आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवा. तुम्हाला जोडीदाराकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात  भागीदारीच्या   व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैशांवरून कोणाशी मतभेद होण्याची शक्यता असून ते प्रकरण पोलिसापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 
कन्या : आठवड्याच्या सुरुवातीत 6 आणि 7 तारखेला तुम्ही टेन्शनमध्ये राहण्याची शक्यता आहे. पण जसा जसा वेळ पुढे जाईल तुम्हाला परिस्थितीत बदल जाणवेल. गणेशजींचा सल्ला आहे की तुम्ही या काळात कुठल्याही प्रकाराचेभ महत्त्वाचे निर्णय घेऊ नका अन्यथा तुमचे निर्णय येणार्‍या काळात गंभीर रूप घेऊ शकतात. वित्तीय प्रकरणासाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे.
 
तूळ : या आठवड्यात तुम्हाला एखाद्या कार्याची सुरुवात संयम ठेवूनच करायला पाहिजे. तुम्हाला व्यावसायिक कार्यांसाठी देश किंवा कार्यस्थळापासून दूर जाण्याचे योग येतील. एखाद्या हाय लेवेल मीटिंग किंवा सेमिनारमध्ये तुमची उपस्थिती राहील. एखाद्या सरकारी कार्याच्या संबंधात उच्च अधिकार्‍याशी तुमची भेट घडेल. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती आणि व्यवसाय विस्तार संबंधी योजना आखू शकता. 
 
वृश्चिक : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांची भरपूर मदत मिळेल. त्यांच्या मदतीमुळे तुम्ही तुमचे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स यशस्वीरीत्या पार पाडाल. शनीच्या साडेसातीमुळे तुमच्या मनात भिती राहणार आहे ज्यामुळे तुम्ही आठवडाभर तणावात राहाल 5, 6 आणि 8 तारखेला वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.
 
धनू : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची मिळकत उत्तम राहणार आहे. जर तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवले नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 6 आणि 7 तारखेच्या दरम्यान तुमच्या मिळकतीत नक्कीच वाढ होणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायाशी निगडित योजनांना विस्तार देऊ शकता. नवीन मालमत्ता, मशीनरी आणि बाजारात जागा खरेदी करू शकता.  
 
मकर : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही प्रत्येक कार्याला बुद्धिमत्ता आणि विधिवत प्रकारे करण्यात यशस्वी ठराल ज्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भाग्याचा साथ लाभणार आहे. तुमच्यात असलेली बहुमुखी प्रतिभा जगापुढे येणार आहे. तुमचे अनुशासन आणि त्वरित निर्णयशक्तीच्या कलेला लोकं स्वीकारतील. या काळात तुमच्यात असणारा तुमचा प्रबंधकीय गुण लोकांसमोर येईल.
 
कुंभ : या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी फारच आनंददायक राहणार आहे. या वेळेस तुम्ही मानसिकरूपेण स्वतः:ला निश्चित अनुभवाल. पण या आठवड्यात तुमच्या खर्चात वाढ होणार आहे, आणि तुम्हाला जाणवेल की पैसा पाण्यासारखा तुमच्या हातातून जात आहे. पण अशा परिस्थितीतही तुम्हाला पैशाची तंगी राहणार नाही. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढणार आहे. 
 
मीन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही फारच प्रसन्न असाल आणि तुम्हाला सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही वस्त्र, दागिने, कोस्मेटिक्स इत्यादींची खरेदी करू शकता. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहणार आहे. शेयर बाजार, ट्रेडिंग इत्यादीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. दूध, तेल, पेट्रोल, शीत पेय, खाद्य सामग्री इत्यादीमध्येचांगला लाभ मिळू शकतो.