ganesh chaturthi
✕

दररोज एक चमचा बेसन चेहर्‍यावर लावा, फरक बघा

Updated: मंगळवार, 5 जुलै 2022 (13:58 IST)
 
तेलकट त्वचेसाठी- जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला फेस वॉश वापरावा लागेल ज्यामुळे चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करता येईल. दुसरीकडे, जर तुम्हाला बेसनाचे क्लिन्झर वापरायचे असेल तर एक चमचा बेसनमध्ये टोमॅटोचा लगदा मिसळा. थोडे गुलाबजल एकत्र करून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटे असेच राहू द्या. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चेहरा धुतल्यानंतर फरक आपोआप दिसून येईल. तुमचा चेहरा किती स्वच्छ आणि चमकदार आहे.
 
कोरड्या त्वचेसाठी- जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही फेस वॉश निवडताना तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून त्वचा मॉइश्चराइज राहते. कोरडी त्वचा असणाऱ्यांना बेसन क्लिन्झर बनवण्यासाठी या गोष्टींची गरज असते. एक चमचा बेसनामध्ये दही आणि मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. साधारण पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. फरक चेहऱ्यावर आपोआप दिसून येईल.
 
पुरळ प्रभावित त्वचा- जर तुमचा चेहरा खूप संवेदनशील असेल. आणि अनेकदा पुरळ येत असतीलत तर केमिकलऐवजी बेसन पॅकच वापरा. बेसन क्लिन्झर बनवण्यासाठी एक चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि चंदन पावडर मिसळा. त्यानंतर गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. ते सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर अधिक पुरळ येणार नाही. आणि त्वचेची जळजळ देखील कमी होईल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरता? त्वचेला होऊ शकते ‘हे’ नुकसान!

ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत होऊ शकते मदत!

वयाची पन्नाशी ओलांडली तरी राहा फिट आणि निरोगी; दररोज करा ही सोपी योगासने!

नैतिक कथा : मूर्खांचे राज्य; गोष्ट जुलमी राजा आणि विद्वानांची

आता, भेंडी अनेक दिवस ताजी राहील; फक्त ही सोपी युक्ती करा

पुढील लेख
Show comments