suvichar
✕

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

Updated: बुधवार, 1 मे 2024 (13:49 IST)
 
केस कापण्याच्या मदतीने स्प्लिट एंड्सची समस्या सहजपणे सोडविली जाऊ शकते. पण जर तुम्हाला तुमच्या केसांच्या लांबीशी तडजोड करायची नसेल तर तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
 
जास्वंदचे फुल, मेथी, कढीपत्ता आणि आवळा हेअर मास्क
हा हेअर मास्क केवळ स्प्लिट एंड्सवरच उपचार करत नाही तर तुमच्या केसांच्या एकूण आरोग्याची देखील काळजी घेतो.यासाठी 5-6 जास्वदांची फुले आणि 2 जास्वदांची पाने, कढीपत्ता, मेथी आणि आवळा एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यात तुमच्या आवडत्या इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब मिसळा. त्यात बदामाचे तेलही मिक्स करू शकता. आता तयार केलेला मास्क केसांवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर केस नैसर्गिक क्लिन्झरने धुवा.
 
अंडयातील बलक वापरा
 
अंड्यातील बल्क मध्ये  तेल आणि प्रथिने असतात, ज्यामुळे केस मॉइश्चरायझ आणि मजबूत होतात. याच्या वापराने केस अधिक रेशमी आणि गुळगुळीत होतात आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर होते. यासाठी केसांच्या टोकांना अंड्याचा बल्क लावा आणि शॉवर कॅपने झाकून 30 मिनिटे राहू द्या. शेवटी, आपले केस धुवा.
 
एवोकॅडो मास्क बनवा
एवोकॅडोमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिड असतात जे केसांना पोषण आणि मॉइश्चरायझ करू शकतात. यामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर होते. यासाठी एक पिकलेला एवोकॅडो घ्या आणि तो चांगला मॅश करा. आता ते केसांच्या टोकांना लावा. धुण्याआधी 30 मिनिटे तसेच राहू द्या.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Priya Dixit   
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

कफाचा त्रास कमी करण्यासाठी करा ही २ योगासने; श्वसनास मिळू शकतो आराम!

वेदांचे आशीर्वाद; पौराणिक कथा राजकुमार आणि भिक्षुकाची

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य का धोक्यात येते? समजून घ्या प्रमुख कारणे

पुढील लेख
Show comments