Biodata Maker marathi
✕

केस सांगतात माणसाचा स्वभाव

Updated: गुरूवार, 24 एप्रिल 2025 (23:19 IST)
 
कपाळाच्या वर फार चकमक नसणारा, साधासा, निटेड, पिंट्रेड हेअरबेल्ट वापरल्याने व्यक्तिमत्त्वाला कोझीनेस प्राप्त होतो. अशा प्रकारे केस बांधणार्‍या मुली आतल्या गाठीच्या वाटत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचा उबदारपणा प्राप्त होतो. 
 
काही जणींना केसांमधल्या एखाद्या बटेला गुंडाळण्याची  हौस असते. अशांना थोडी हटके हुशारी असणारं आर्टिस्टिक समजलं जातं. शिवाय अशा मुली ट्रेण्डी असतात.
 
 तुमचेही केस लांब आणि वेव्ही असतील तर तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. अशा प्रकारचे केस मादक आणि फेमिनाईन समजले जातात. चारजणींमध्ये लक्ष वेधून घेणारा हा केशसंभार परफेक्ट समजला जातो.
ALSO READ: आजीच्या काळातील जादुई केसांच्या तेलाची रेसिपी जाणून घ्या
लांबसडक केस मोकळे सोडणं आवडणार्‍या स्त्रिया मोकळ्या, फुलपाखरी वृत्ती असणार्‍या समजल्या जातात. मध्यम लांबीच्या मोकळ्या केसातून तुमचं ईव्हन टेम्पर झळकतं, आत्मविश्वास दिसतो. अशा प्रकारचे केस असणार्‍या स्पष्टवक्त्या असतात. 
 
मध्यम लांबीचे किंवा लांब, मोकळे, वार्‍यावर उडणारे, थोडे अस्ताव्यस्त केस आय डोण्ट केअर वृत्ती दर्शवतात. अशा स्त्रिया बिनधास्त आणि जगाची पर्वा न करणार्‍या असतात. 
ALSO READ: चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या
बॉयकटपासून डायनाकटपर्यंत सगळे छोटय़ा कटचे प्रकार व्यक्तिमत्त्वातली शिष्टपणाची बाजू समोर आणतात. त्यातून समोरच्याला हातभर दूर राहाण्याचा संकेत दिला जातो. भांग पाडून वेणी घालणं हा गर्लिश लूक आहे आणि तो क्यूट, इनोसंट समजला जातो.
 
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

Happy Bhai Dooj 2026 Images भाऊबीज शुभेच्छा फोटो

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments