Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cracked Heels भेगा पडलेल्या टाचांवर प्रभावी घरगुती उपाय

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (14:28 IST)
 
टाचांना भेगा का पडतात?
टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. पायात ओलावा नसणे, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे, कोरड्या पायांची काळजी न घेणे इत्यादी इतर अनेक कारणे असू शकतात.
 
कोरफड
भेगा पडलेल्या टाचांसाठी एलोवेरा जेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे सोपे होते. यासाठी कोरफड आणि साखर मिसळून स्क्रब बनवू शकता.
 
कडुलिंब
कडुलिंब आणि हळद यांचे मिश्रण भेगा पडलेल्या टाचांसाठी खूप फायदेशीर आहे. हळद आणि कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे तुमच्या टाचांच्या भेगा पडण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी कडुलिंबाच्या पानांची आणि हळद पावडरची पेस्ट बनवून लावा.
 
खोबरेल तेल
खोबरेल तेल त्वचेसाठी खूप चांगले आहे. रात्री झोपण्यापूर्वी हे लावा, तुमच्या टाच मऊ होतील आणि थकवाही कमी होईल.
 
केळी
भेगा पडलेल्या टाचांसाठी तुम्ही मॅश केलेले पिकलेले केळे देखील वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या टाच मऊ होतील. परंतु तुम्हाला ते फक्त 15 मिनिटे ठेवावे लागेल, त्यानंतर या द्रावणात तुमचे पाय भिजवा.
 
सैंधव मीठ
तुमच्या भेगा पडलेल्या टाचांसाठी सैंधव मीठ खूप फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला गरम पाण्यात सैंधव मीठ घालावे लागेल आणि तुमचे पाय काही काळ पाण्यात बुडवून ठेवावे लागतील. याचा तुमच्या टाचांना खूप फायदा होईल.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गुळाचा फेस पॅक त्वचेसाठी ठरेल फायदेशीर? जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत

गर्भधारणेपूर्वी जीवनशैलीत करा हे महत्त्वाचे बदल; आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

योग हा प्रत्येक मानसिक आजार, चिंता आणि नैराश्यावरचा उपाय आहे, इतर फायदे जाणून घ्या

नैतिक कथा: बुद्धीने मिळवलेला विजय

घड्याळाचे काटे नेहमी उजवीकडे का फिरतात; याचे उत्तर माहित आहे का तुम्हाला?

पुढील लेख
Show comments