Dharma Sangrah

1 June New Rules: आज पासून नवीन नियम लागू!

Updated: शनिवार, 1 जून 2024 (17:57 IST)
 
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नव्याने ठरवल्या जातात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री पेट्रोलियम कंपन्या याची घोषणा करतात. अशा परिस्थितीत 1 जून 2024 रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. यापूर्वी मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती. एक जूनपासून दीर्घकाळ स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.
 
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओला जावे लागणार नाही 
1 जूनपासून नवीन वाहतुकीचे नियम लागू होत आहेत. नव्या महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्येच परीक्षा देणे आता बंधनकारक राहणार नाही. अशा स्थितीत ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया आता सोपी होण्याची अपेक्षा आहे. 1 जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. यामुळे लोकांना ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देण्यासाठी आरटीओला जाण्यापासून वाचवले जाईल.
 
वाहतुकीचे नियम कडक होणार 
नवीन वाहतूक नियमांनुसार वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. 18 वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालवल्यास किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द तर होईलच पण 25 वर्षांसाठी नवीन परवानाही दिला जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 ते 2000 रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
 
आधार कार्ड अपडेट 14 जून पर्यंत होणार 
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या मते, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल तर तुम्ही 14 जूनपर्यंत ते मोफत करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया UIDAI पोर्टलवर 14 जून 2024 पर्यंत मोफत आहे. जर तुम्ही 14 जून नंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल. 
 
पॅन-आधार लिंक करणे 
आयकर विभागाने नुकत्याच केलेल्या अधिसूचनेत करदात्यांना 31 मे पर्यंत त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे 

बँकेला सुट्ट्या
या महिन्यात बँका 10 दिवस बंद असणार आहे. या मध्ये दुसरा आणि चौथा रविवार असल्याने बँका 6 दिवस बंद असणार असून उर्वरित दिवस बँका सणासुदीमुळे बंद असणार आहे. 
 

Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments