अनिल अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा मुंबई उपनगरासाठीचा वीजनिर्मिती, वीजपारेषण आणि वीजवितरणाचा व्यवसाय गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे, असे गुरुवारी जाहीर करण्यात आले. या समूहातील अदानी ट्रान्स्मिशन लिमिटेड कंपनी त्यासाठी तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देणार आहे. मार्च २०१८ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊन एप्रिल २०१८ पासून अदानी...