Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय बनावटीची पहिली कार बीएमडब्ल्यूने लाँच केली

Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (14:41 IST)
 
त्याचबरोबर कोरोना काळात मंदावलेला वाहन उद्योग देखील पुन्हा गतिमान झाला आहे. अनेक विदेशी वाहन कंपन्यांची वाहने बाजारात दाखल होत आहे. यामध्ये आता जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी पहिली मेड इन इंडिया असेम्बल्ड कार एम ३४० आय ड्राईव्ह लाँच केली असून तिची किंमत आहे ६२.८० लाख रुपये. चेन्नई प्रकल्पात ही कार उत्पादित करण्यात आली. भारतात उत्पादन झाल्याने तिची किंमत कमी आहे असे समजते.
 
या कारसाठी ६ सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला फक्त ४.४ सेकंड लागतात. ८ स्पीड स्टेप्ट्रोनिक स्पोर्ट ऑटो ट्रांसमिशन असून एलईडी हेडलाईट लेसर लाईट्ससह दिले गेले आहेत. डे टाईम ड्राईव्हिंग लाईट रिंग्स, एल आकारात एलईडी टेल लाईट दिले गेले आहेत. तीन रंगात ही कार उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग सेट अप, अटेंटीव्ह असिस्टंट ब्रेक असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, डायनेमिक स्टॅबीलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरींग ब्रेक कंट्रोल असून ही कार प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा अंतरिम आदेश कायम ठेवला

रिक्षा - टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून अनिवार्य! सरकार कारवाई सुरू करणार

Gen Z यांच्या प्रेम आणि नातेसंबंधांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शब्द, 'सिच्युएशनशिप' ते 'सोलमेट'पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

पुढील लेख
Show comments