Marathi Biodata Maker
✕

खिशाला भार ; कटिंग चहा महागला

Updated: गुरूवार, 17 मार्च 2022 (14:42 IST)
 
मागील काही दिवसांपासून महागाई वाढत असल्याचे दिसत असून त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आले आहे. तसेच साखर, चहापावडर यांचे भाव वाढल्याने चहाचे दर ही वाढवण्यात आले आहेत. 
 
काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर  इतकी दरवाढ करण्यात आली होती. तसेच चहा तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य व गॅसच्या दरातही वाढ दिसून येत असताना चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं कठीण होत होते. अशात टी कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे 10 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे. 
 
अलीकडेच दूध उत्पादक महासंघ कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. अशात राज्यात महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

न्यूझीलंडविरुद्धच्या 'अ' सामन्यांमधून ऋषभ पंत बाहेर, या यष्टीरक्षकाचा समावेश

हसन महमूद कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बांगलादेशी वेगवान गोलंदाज ठरला

माझी बदली झालेली नाही, भेसळखोरांविरुद्धचा लढा सुरूच राहणार”; तुकाराम मुंडे यांनी बदलीच्या वृत्तांवर केला खुलासा

LIVE: महाराष्ट्रात किसान कर्ज माफी योजनेअंतर्गत ३.५१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुंबईच्या धारावीचा कायापालट होणार, १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात

पुढील लेख
Show comments