Festival Posters
✕

सोन्याचे भाव घटलेत, गुंतवणुकीचे हे 5 पर्याय जाणून घ्या?

Updated: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (16:21 IST)
 
आवश्यकता भासल्यास तु्म्ही हे बाँड आठ वर्षांपूर्वीही विकू शकता. पाच वर्षांपूर्वी बाँड विकताना मिळणाऱ्या रकमेवरही टॅक्स द्यावा लागत होता.
 
2) बाँड्स खरेदी कसं करणार?
सरकारमार्फत जारी करण्यात येणारे हे बाँड्स तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.
 
ऑफलाईन पद्धतीत तुम्ही बँक, HSCIL ऑफिस, पोस्ट ऑफिस आणि एजंट्सकडून फॉर्म घेऊन बाँड्स विकत घेऊ शकता.
 
तसंच RBI ची वेबसाईट आणि बँकांच्या ऑनलाईन अॅप्लिकेशनमार्फतही तुम्ही फॉर्म विकत घेऊ शकता. ऑनलाईन खरेदीत 50 रुपयांची सूट दिली जाते.
 
यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, दरसाल 2.5 टक्के व्याजही तुम्हाला मिळतं. हे व्याज दोन भागात सहा-सहा वर्षांच्या अंतराने मिळतं.
 
या व्याजावर टॅक्स द्यावं लागेल. म्हणजे एक लाख रुपये लावले तर 2500 रुपये व्याज मिळेल. हा व्याज तुमच्या उत्पन्नात जमा होईल, त्यावर टॅक्सही बसेल.
 
यामध्ये एक नुकसानही आहे. जर सहा महिन्यांनंतर तुमचा बाँड विकण्याची गरज पडली पण त्यावेळी सोन्याचा दर कमी असेल, तर तुमचं नुकसान होऊ शकतं.
 
SGB मार्फत तुम्ही वैयक्तिकपणे एका आर्थिक वर्षात एक ग्रँमपासून ते जास्तीत जास्त चार किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकता.
 
तर, संस्था किंवा कंपन्या 20 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
 
आरडी इनव्हेस्टमेंटचे संचालक आणि गुंतवणूक तज्ज्ञ राजेश रोशन सांगतात, "सॉव्हरन गोल्ड बाँड प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे.
 
शुद्धतेबद्दल बोलायचं झाल्यास हे बाँड इलेक्ट्रॉनिक रुपात असल्यामुळे हे पूर्णपणे शुद्ध असतं. खरं तर, सोन्याचे दागिनेही 24 कॅरेट शुद्ध नसतात.
 
3) प्रत्यक्ष दागिन्यांची खरेदी
प्रत्यक्ष दागिने म्हणजेच सोन्याला तुम्ही स्पर्श करू शकता. उदाहरणार्थ, सोन्याचे कोणतेही दागिने, सोन्याची नाणी, किंवा बिस्किट यांचा समावेश होतो.
 
दागिन्यांच्या तुलनेत नाणी किंवा बिस्किट यांच्या खरेदीत फरक असतो. यामध्ये मजुरी (मेकिंग चार्ज) वगैरे लागतं.
 
दागिन्यांची मजुरी 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असते. म्हणजेच एक लाखांचं सोनं खरेदी केल्यानंतर तुम्हाला 20 हजार अधिकचे द्यावे लागतात. पण नाणी किंवा बिस्किटांच्या खरेदीवरची मजुरी दोन ते चार टक्के असते.
 
पण सोनं विकताना मजुरी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष सोनं विकताना आपल्याला नुकसान होऊ शकतं.
 
शिवाय, सोन्याच्या सुरक्षेबाबतही तुम्हाला काळजी घ्यावी लागते. पण गोल्ड बाँड किंवा इतर पद्धतींमध्ये सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत नाही.
 
जाणकारांच्या मते, तुम्हाला सोनं परिधान करायचं असेल तर प्रत्यक्ष दागिने खरेदी करणंच उत्तम. दागिन्यांमुळे गुंतवणूक आणि वापर हे दोन्ही करता येऊ शकतं.
 
पण तुम्हाला फक्त सोन्यात गुंतवणूक करायची आहे, तर बाँडचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरेल.
 
4) गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF)
गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक ही शेअर बाजाराशी मिळतीजुळती आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करता त्याप्रमाणेच ही खरेदी करू शकता.
 
यामध्ये डिमॅट अकाऊंट उघडणं गरजेचं आहे. यामध्ये ETF ची खरेदी करता येऊ शकते. याची विक्री रोजच्या रोज होत असते.
 
काही कंपन्या गोल्ड ETF जारी करतात. तुम्ही ते विकत घेऊ शकतात. याची सिक्युरिटी म्हणजेच सोनं हीच असते. जेव्हा तुम्हाला गरज असते किंवा ETF चे भाव वाढले आहेत, हे तुमच्या निदर्शनास येताच तुम्ही ते विकू शकता.
 
यामध्ये फक्त एकच समस्या आहे. ती म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी ETF विकायचे आहेत, त्याच वेळी ते विकले जातील किंवा नाही, हे महत्त्वाचं ठरतं.
 
म्हणजे तुम्हाला सोनं विकायचं आहे, पण खरेदी करणारा कुणीच नसल्यास समस्या निर्माण होते.
 
पण शेअर बाजारात अशा प्रकारची समस्या जास्त येत नाही. कित्येक कंपन्या अशा प्रकारची खरेदी विक्री नेहमी करत असतात.
 
भारतात ETF जास्त लोकप्रिय नाही. अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे जास्त प्रचलित आहे.
 
5) म्युच्युअल फंड्स
म्युच्यूअल फंड्सच्या माध्यमातून तुम्ही गोल्ड फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. 500 पासून ही गुंतवणूक करता येऊ शकते. छोट्या गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
 
म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या कित्येक कंपन्या गोल्ड फंड्सच्या क्षेत्रात आहेत.
 
या कंपन्या तुमचा पैसा गोल्ड फंडमध्ये गुंतवतात. बाजारातील चढ-उतारानुसार तुम्हाला त्याचा परतावा मिळू शकतो.
 
या प्रकारात ETF सारखी समस्या कधीच येत नाही.
 
म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले. दोन वर्षांनी तुम्हाला त्या पैशांची गरज असल्यास कंपनीला ते पैसे परत द्यावेच लागतात. तेव्हा खरेदीदार नाही वगैरे कारण सांगता येत नाहीत.
 
यामध्ये कंपनीला काही शुल्कही द्यावा लागतो. हा दर एक ते दोन टक्के असू शकतो.
 
सोन्यात गुंतवणुकीचे फायदे काय असतात?
राजेश रोशन सांगतात, "प्रत्येक गुंतवणुकीचे फायदे-तोटे असतात. व्याजदरात घट-वाढ होत असते. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत विविधता राखणं गरजेचं असतं."
 
"सर्व गोष्टी विचारात घेतल्यास आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच ते दहा टक्के गुंतवणूक सोन्यात करणं योग्य राहील. बाजार कोसळल्यानंतरही सोन्याचा दर वाढतो. बाजार पूर्ववत झाला तरी सोन्याचा दर आहे तितकाच राहतो. त्यामुळे सोन्यात कमी जोखीम आहे."
 
महिलांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दोन गोष्टी पाहाव्या लागतील.
 
काही महिला घरखर्चानंतर उरलेले पैसे घरात ठेवण्याऐवजी गुंतवणूक करू इच्छितात. तर काही महिलांना आपल्या उरलेल्या पैशांचा वापर करून आणखी पैसे कमवायचे असतात.
 
रोशन यांच्या मते, लहान रकमेची बचत करणाऱ्या महिलांसाठी जास्त मोठी जोखीम घेणं शक्य नसतं. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक त्यांच्यासाठी योग्य असते. जास्त जोखीम घेणाऱ्यांसाठी इतर पर्याय खुले आहेत.
 
तसंच नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना किती प्रमाणात जोखीम घेता येईल, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
 
पण कोणतीही गुंतवणूक करण्याआधी मोठी जोखीम कधीही घेऊ नये. सुरुवात ही छोट्या स्वरुपाच्या गुंतवणुकीने केल्यास त्याचा आपल्याचा चांगला उपयोग होतो.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Silver Price Crash चांदी ₹२.२६ लाखांनी स्वस्त, सोन्याचे भावही कोसळले; बाजारात प्रचंड घसरण!

LIVE: लोकल ट्रेन थांबल्याने ॲप टॅक्सीच्या भाड्यांमध्ये मोठी वाढ

एसआयआर (SIR) प्रक्रियेची अंतिम मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार

महाराष्ट्र सरकार कडून दोन नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि १४ संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा

दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करणार आहात? कॅमेरा, बॅटरी आणि अपडेट्स तपासण्याची चेकलिस्ट

पुढील लेख
Show comments