Festival Posters
✕

कांद्याचा पुन्हा वांदा, व्यापा-यांचा बेमुदत संप

Updated: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (07:54 IST)
 
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने कांदा उत्पादक शेतक-यांची अनेक आंदोलने पाहायला मिळाली. सुरुवातीला केंद्राने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतक-यांमध्ये नाराजी होती. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. आता कुठे कांदा लिलाव सुरू झाला होता, तोच आता कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघू न शकल्याने आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. ही बैठक जिल्हाधिका-यांसोबत झाली. यावेळी तोडगा निघू शकला नाही. मुळात कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने व्यापा-यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा व्यापा-यांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. कांदा उत्पादक शेतक-यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

प्रेमविवाहानंतर पतीचा नवीन घरासाठी पैसे आणण्याकरिता दबाव; सांगलीत २४ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दर दिवाळीला माहेरून १० तोळे सोने आणण्याचा दबाव! पायल झांबरे आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासरे अखेर गजाआड

LIVE: निधी न मिळाल्याने NCP आमदारांमध्ये नाराजी; सुनेत्रा पवारांकडे तक्रार करत दिला पराभवाचा इशारा

निधी न मिळाल्याने NCP आमदारांमध्ये नाराजी; सुनेत्रा पवारांकडे तक्रार करत दिला पराभवाचा इशारा

महायुतीतील कलह चव्हाट्यावर! CM फडणवीसांचा शिंदे गटाला मोठा धक्का; मंत्र्याचे अधिकार काढून घेतले

पुढील लेख
Show comments