Dharma Sangrah

पांढरे सोने झळाळले! १० हजार रुपये क्विंटल; तब्बल ५ दशकांमधील सर्वाधिक दर

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:42 IST)
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेला कापूस सध्या चमकला आहे. कापसाला प्रति क्विंटल तब्बल १० हजार रुपये एवढे दर मिळाला आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या वातावरणात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, कापसाला गेल्या ५० वर्षात मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
 
यंदा लांबलेला पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. कापसाचे पिकही यातून सुटलेले नाही. त्यामुळेच यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट आहे. म्हणूनच भावाने उसळी मारल्याचे सांगितले जात आहे. नागपूरमध्ये एका शेतकऱ्याच्या कापसाला उच्चांकी म्हणजे १० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. येते काही दिवस कापसाचे दर चढेच राहणार असल्याचा अनुमान काढला जात आहे. खान्देश आणि विदर्भात कापसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. गेल्या ५ दशकातील सर्वाधिक दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. कोरोनाच्या संकटात पांढरे सोने मदतीला धाऊन आल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिली आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

मुसळधार पावसामुळे ट्रेन रद्द झाल्यास परतावा मिळतो का? IRCTC चे नियम जाणून घ्या

सौरव गांगुलीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य; अनुत्तीर्ण झाल्यास १६ ऑगस्टपासून परवाना रद्द केला जाईल

आज कोकण आणि पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

रायगडमध्ये मुसळधार पावसानंतरचे एक भयानक दृश्य; पाण्यामध्ये अनेक सिलिंडर खेळण्यांसारखे वाहून गेले

पुढील लेख
Show comments