Dharma Sangrah

‘डोक्याला शॉट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित

सोमवार, 28 जानेवारी 2019 (14:52 IST)
मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना
दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो. त्यातही दोन भिन्न भाषिक लग्न करणार असल्याने मित्रांना वेगळीच चिंता सतावत असल्याचेही टिझरमध्ये दिसत आहे. तरूण पिढीला लग्नाच्या आधी आणि नंतर वाटणारी भीती, हुरहूर, तणाव, जबाबदारी याचे दर्शन या टिझरमधून घडत आहे. तरुणांची ही स्थिती दिग्दर्शकाने अतिशय रंजक आणि मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे, अशा प्रत्येक जोडप्याला हा चित्रपट स्वानुभवाची जाणीव करून देईल. याआधीही 'लग्न आणि मैत्री’ या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोक्याला नक्कीच शॉट देईल. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि सुमन साहू चित्रित हा सिनेमा १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, गणेश पंडित यांच्यासह रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल, म्हणाले-ही भूमिका देवाचा आशीर्वाद

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

सलमान खानने आपल्या तब्येतीबद्दलच्या अफवांना पूर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

वाराणसीचा रहस्यमय शिवधाम, जिथे भगवान रामांना रावणाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली

पुढील लेख
Show comments