Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'

Updated: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (12:31 IST)
या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. 'फुगे' या अतरंगी नावामुळेच या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. खास करून सिनेमातील स्वप्नील आणि सुबोध मधला याराणा या सिनेमाला वेगळ्याच टप्प्यावर घेऊन जात आहे. 

मुख्यत्वेकरून मराठी सिनेसृष्टीचा चार्म अभिनेता स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटला तर त्यात लव्हस्टोरी ही आलीच! त्यामुळे 'फुगे' मध्ये देखील स्वप्नील रोमँटिक हिरोची भूमिका करताना दिसेल यात वाद नाही.  मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील मध्यमवर्गीय आणि पुण्याच्या स्वाभिमानी नायकाची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. अशीच एका पुण्यातील मध्यमवर्गीय आदित्य अग्निहोत्री नामक तरुणाची भूमिका करताना तो या सिनेमात दिसेल. मग अशावेळी आतापर्यंत लोकमान्य, बालगंधर्व सारखे ऐतिहासिक आणि धीरगंभीर सिनेमे करणारा सुबोध भावे यात काय करतोय असा प्रश्न स्वाभाविक पडतो. 'फुगे' या सिनेमातील सुबोधचा लूक प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज पेकेज ठरणार आहे. 'फुगे' सिनेमाद्वारे सुबोध आपल्या या चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडलेला दिसणार असून यात तो ऋषिकेश देशमुख नावाच्या, आताच्या मनमौजी डेनिम घालणाऱ्या आणि स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या युवकाच्या भूमिकेतून त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे. 

अशाप्रकारे, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर सिनेमा प्रेमाची बेकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे. 'प्रेम' केवळ प्रेमीयुगुलांचे नसते तर ते दोन मित्रांचे देखील असू शकते असेच काहीसे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-सुबोधचा हा 'याराणा' येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या या हटके बेकस्टोरीची हि हटके गम्मत पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

"क्लीन अप कंपनी"चा ट्रेलर प्रदर्शित; तीन मित्र मृतदेह विल्हेवाट लावणारी कंपनी सुरू करतात

ओरीच्या बेडजवळ असतो सलमान खानचा फोटो! 'खतरों के खिलाड़ी १५'मध्ये सांगितलं खास कारण

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हेडन पॅनेटियर यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

वाटल्यास बंदी घाला... पण माझी कमाई थांबवू नका; 'विमल इलायची' वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानचे विधान तुफान व्हायरल

पुढील लेख
Show comments