ganesh chaturthi
✕

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

Updated: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 (12:35 IST)
 
‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही  भन्नाट जोडी  पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 
 
टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास रेखाटला आहे. सई - समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद - ईशा  यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक देखील यात पाहायला मिळतेय.  संवादांची सहजता, पात्रांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून टिझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा 'गुलकंद' किती मुरलेला आहे, हे १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात कळेल. 
 
 सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, " ‘गुलकंद’ हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील गोडव्याचा एक अनोखा मनोरंजक प्रवास आहे. तुमच्या आमच्या घरातील ही गोष्ट असून यात दिसणारे हटके कपल्स आपल्याला अनेकदा आपल्या आजुबाजुला दिसतात आणि म्हणूनच ‘गुलकंद’शी प्रेक्षक सहज समरस होतील. 
बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत असा एक फॅमकॉम चित्रपट येत आहे. 
प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना समीर चौघुलेला पाहिले आहे. मात्र, पहिल्यांदाच ‘गुलकंद’ मध्ये समीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या टिझरमध्ये दाखवलेली ढवळे आणि माने कुटुंबातील जिव्हाळा रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, याचा विश्वास आहे. हा चित्रपट प्रत्येकाला हसवतानाच त्यांच्या आयुष्यातील प्रेमाची गोड आठवण करून देईल."
ALSO READ: छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदाचे किमान १० आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट ११ व्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ही आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टिझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा."

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments