Festival Posters

पुन्हा कुटुंबासोबत चित्रपटगृहात आनंदाचा खेळ - ‘झिम्मा’!

Updated: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:16 IST)
 
 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटाचा ट्रेलर हसतखेळवत बरंच काही सांगून  जातो. आयुष्य जगण्यातली मजा आपण आपल्याही नकळत हरवून बसतो, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे. महिलांनीच नाही तर प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.
 
 'झिम्मा'विषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतात, '' लॉकडाऊनच्या बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी खुली होत आहेत. चित्रपटगृहात जाणे आता पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रेक्षकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून जावी आणि त्यांनी चित्रपट चित्रपटगृहातच येऊन पाहावा, यासाठीच आम्ही 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर प्रिव्ह्यू थिएटरमध्ये प्रदर्शित करत आहोत. दिग्दर्शक म्हणून इंग्लंडमध्ये चित्रित होणारा हा माझा तिसरा चित्रपट आहे. 'झिम्मा'साठी मी खूपच उत्सुक आहे. वेगवेगळ्या वयोगटातील या नायिका अभिनयात अव्वल आहेत. यात अनेक कलाकार असल्याने आम्ही सर्वांनीच चित्रीकरणादरम्यान भरपूर धमाल केली आणि ॲाफस्क्रीन केलेली ही धमाल तुम्हाला ॲानस्क्रीन बघायला मिळेल. विषयही वेगळा आहे. यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उलगडा 'झिम्मा' पाहिल्यावरच होईल.''
 
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग, स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह निर्मित हा चित्रपट १९ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments