Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Marathi Movie boyz : किशोरावस्थेवर भाष्य करणार 'बॉईज' सिनेमा

Updated: गुरूवार, 1 जून 2017 (14:14 IST)
तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा हा टिजर पोस्टर पाहताना हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग सिनेमा असल्याचे लक्षात येते. तुर्तास या टिजर पोस्टरमधली तीन मुले कोण आहेत हे गुपितच ठेवण्यात आली असून, खुद्द सनी लिओनी या सिनेमातील एका गाण्यात थिरकली आहे;सुनिदी चौहानच्या आवाजातील हे गाणे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी कॉरीओग्राफ केले असल्यामुळे  प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 

या चित्रपटाची आणखीन एक खासियत म्हणजे, आतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत सिने-दिग्दर्शक संगीत-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारे अवधूत गुप्ते आपल्याला ''बॉईज' या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक यशस्वी चित्रपटातून सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात 'बॉईज' द्वारे आपले पदार्पण करत आहेत. 
या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांची भूमिका आहे. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, सिनेमाच्या टिजर पोस्टरवरील ही तिकडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. किशोरवयीन मुलांची धुडगूस, मौजमज्जा आणि प्रेम दाखवणारा हा सिनेमा युथ फेस्टिवल महिना म्हणून प्रचलित असलेल्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

१५ ऑगस्ट रोजी पाहण्यासारखे ८ सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपट

Independence Day 2026 या सेलिब्रिटींनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडला, काहींनी भगतसिंग यांची निवड केली, तर काहींनी राणी लक्ष्मीबाई यांची

स्वातंत्र्यदिनानिमित्त वीकेंडला फिरण्यासाठी देशभक्तीचा अनुभव देणारी निसर्गरम्य ठिकाणे

राजकुमार रावच्या 'प्रहार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली

ट्रोब विद्यापीठाने राणी मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली

पुढील लेख
Show comments