Dharma Sangrah
✕

मल्टीस्टारर 'बसस्टॉप' चे धम्माल, मस्तीत म्युजिक लॉंच

Updated: गुरूवार, 6 जुलै 2017 (12:29 IST)
विशेष म्हणजे या गाण्याला ह्रीषिकेश-सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर या नव्या दमाच्या संगीतकारांनी संगीत दिले असल्यामुळे, ही सर्व गाणी तरुण पिढीला आपलीसी वाटतील अशी झाली आहेत. ह्रीषिकेश -सौरभ-जसराज या त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेले 'मूव्ह ऑन' हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून, रोहित राऊत आणि प्रियांका बर्वे या जोडीने ते गायले आहे. तसेच, क्षितीज पटवर्धन लिखित आणि श्रुती आठवले व जसराज जोशीच्या आवाजातले 'आपला रोमान्स' हे गाणे देखील तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनले आहे. आदित्य बेडेकरने संगीत दिग्दर्शित केलेले योगेश दामले लिखित 'तुझ्या सावलीला' आणि 'घोका नाहीतर होईल धोका' ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. ज्यात रुपाली मोघे आणि सागर फडके या जोडीने 'तुझ्या सावलीला' या गाण्याला स्वरसाज चढवला असून, सागर फडके याच्या अवाजातील 'घोका...' हे गाणे अधिकच प्रभावशाली झाले आहे.

अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अशी तगडी स्टारकास्ट यात पाहायला मिळणार असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी ह्या ज्येष्ठ कलाकारांचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे.  स्टारकास्टच्या जल्लोषपूर्ण वातावरणात लॉंच करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, चित्रपटाचा ट्रेलरदेखील रसिकांना दाखविण्यात आला. ह्या ट्रेलरमध्ये दोन पिढ्यांचे वैचारिक मतभेद आणि आपुलकी, अधोरेखित करण्यात आली असल्यामुळे, हा सिनेमा निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे तर नात्याची भावनिक गुंफणदेखील लोकांसमोर सादर करणार आहे. आजच्या पिढीचा आणि त्यांच्या पालकांवर भाष्य करणाऱ्या 'बसस्टॉप' या सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीसाठी श्रेयश जाधवसोबत पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी यां तिघांनीदेखील महत्वाची भूमिका निभावली आहे. नव्या सोबत जुन्याची फोडणी असलेला हा खुशखुशीत सिनेमा, यंदाचा मान्सून गाजवणार, असे भाकीत केल्यास वावगे ठरणार नाही.   
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

पुढील लेख
Show comments