Festival Posters

Planet Marathi : Hing Pustak Talwar : 'हिंग पुस्तक तलवार'चा हास्यकल्लोळ आता जगभर

Updated: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (21:01 IST)
 
मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची अशी एक विशेष ओळख असते. सर्वांचेच स्वभाव काही सारखे नसतात. या वेबसिरीजमध्येही तशाच काही ना काही खासियत असणाऱ्या भन्नाट व्यक्तिरेखा आहेत. कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लफ्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसेंट अशी ‘अमृता’, दुसऱ्यांची लग्न जुळवणारा पण स्वतःच्या गर्लफ्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु  इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्युशन देणारा ‘पांडे’. आता हे भिन्न स्वभावाचे सर्व जण जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय धम्माल उडेल, हे प्रेक्षकांना ३१ ऑगस्ट पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर पाहायला मिळेल. ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी ही वेबसिरीज लिहिली असून यात अक्षयची भूमिका शौनक चांदोरकर, अमितची भूमिका सुशांत घाडगे, अमृताची भूमिका केतकी कुलकर्णी, समरची भूमिका क्षितिश दाते, कौस्तुभची भूमिका नील सालेकर, सानिकाची भूमिका मानसी भवाळकर आणि पांडेची भूमिका अलोक राजवाडे यांनी साकारली आहे. ही धमाल गॅंग 'हिंग पुस्तक तलवार' मधून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका पेक्षा एक हास्यकल्लोळ माजवणारी मंडळी एकत्र आल्याने 'हिंग पुस्तक तलवार' ही वेबसिरीज प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे हे मात्र नक्की.
 
'हिंग पुस्तक तलवार' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या जॉनरचा कन्टेन्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन वेगळे, थोडे गंभीर विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर आता प्लॅनेट मराठी 'हिंग पुस्तक तलवार'च्या माध्यमातून प्रेक्षकांना भरभरून हसवण्यासाठी सज्ज झाले आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय धमाका उडतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हास्यकल्लोळ असलेली ही वेबसिरीज तरुणाईवर आधारित असली तरी सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे. सध्याच्या परिस्थितीत मित्रांना भेटणे, धमाल, मजामस्ती करणे दुरापास्त होत आहे. मात्र ही वेबसिरीज तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आहे आणि म्हणूनच ही सिरीज तुम्हाला तुमच्या जास्त जवळची वाटेल.''

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments