भारत-श्रीलंका, कसोटी सामना आजपासून
भारत व श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. दोनही संघात जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने नुकतेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दमधील 20 वर्ष पूर्ण केले आहे. या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून त्याचा महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या मैदानावर आजपर्यंत श्रीलंका संघाने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.