Festival Posters
✕

Axar Patel Marriage: क्रिकेटपटू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला

Updated: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (09:09 IST)
 
भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेलने गुरुवारी वडोदरा येथे मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली. अक्षरच्या मिरवणुकीचा व्हिडिओही समोर आला आहे.नवरदेव बनलेल्या अक्षराची गाडीत मिरवणूक निघाली.
त्याच्यासोबत कुटुंबीय बसलेले दिसले.टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू त्याच्या लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी झाला नव्हता. अक्षरने त्यांच्या लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले नसले तरी ट्विटरवरील अनेक चाहत्यांनी त्यांच्या संस्मरणीय दिवसातील काही छायाचित्रे शेअर केली आहेत.
 
मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मेहा पटेल या व्यवसायाने आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहेत आणि ती आहार योजना शेअर करत असते. ती लोकांशी डायटशी संबंधित माहितीही शेअर करते. मेहा इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे.
 
रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर अक्षर पटेल भारतीय संघात कायम आहे. आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या अक्षरने या काळात फलंदाजीतही छाप पाडली. लग्नानंतर अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियात परतणार आहे. मात्र, रवींद्र जडेजा तंदुरुस्त असल्याने अक्षरला आगामी काळात भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे सोपे जाणार नाही.अक्षर पटेलच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 
 
अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

विराट-अनुष्काने मुंबईत खरेदी केले एकापाठोपाठ ३ फ्लॅट्स; किंमती ऐकून थक्क व्हाल!

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० सामना कुठे आणि कधी खेळला जाणार?

आयसीसी महिला पंच आणि झिम्बाब्वेच्या माजी वेगवान गोलंदाज सारा डंबनेवाना यांचे निधन

"ते हुकूमशाही करत आहे," वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकाने गंभीर आणि सहकाऱ्यांवर टीका केली

सारा तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त सचिन भावूक; बाप-लेकीच्या नात्याबद्दल व्यक्त केला खास संदेश

पुढील लेख
Show comments