Hardik's comment विंडीज बोर्डावर हार्दिकची टिप्पणी
Hardik's comment on the Windies board : भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने येथील दौऱ्यात मूलभूत सुविधा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे, असे म्हटले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, हार्दिकच्या नेतृत्वाखाली, भारताने तिसरा एकदिवसीय सामना 200 धावांनी जिंकून मालिकेत 2. 1 आपल्या नावावर केली आहे.
सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “हे सर्वात सुंदर मैदानांपैकी एक आहे. पण पुढच्या वेळी आम्ही इथे आलो, तेव्हा परिस्थिती आणखी चांगली होऊ शकते. प्रवास करण्यापासून ते सगळं सांभाळण्यापर्यंत. गेल्या वर्षीही काही समस्या होत्या.''
"त्याशिवाय, आम्ही येथे खेळण्याचा खूप आनंद लुटला," तो म्हणाला. याआधी, भारतीय संघाचे त्रिनिदाद ते बार्बाडोस हे रात्री उशिरा विमान सुमारे चार तास उशीर झाले होते, ज्यामुळे मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी खेळाडूंची झोप पूर्ण झाली नव्हती. याबाबत त्यांनी बीसीसीआयकडे नाराजी व्यक्त केली होती.