suvichar
✕

IND vs ENG:इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

Updated: शनिवार, 13 जानेवारी 2024 (15:22 IST)
 
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 12 जानेवारी रोजी पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. भारतीय संघाबाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
 
रिंकूला नाही तर ध्रुव जुरेलला संधी मिळाली
निवड समितीने उत्तर प्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संघात स्थान देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ध्रुव जुरेल पहिल्यांदाच टीम इंडियासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार आहे. ध्रुव जुरेलने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार खेळी केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचे पूर्ण वेळापत्रक
पहिला कसोटी सामना- 25 जानेवारी ते 29 जानेवारी- हैदराबाद
दुसरा कसोटी सामना- २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी- विशाखापट्टणम
तिसरा कसोटी सामना- 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी- राजकोट
चौथा कसोटी सामना- 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी- रांची
पाचवा कसोटी सामना- 7 मार्च ते 11 मार्च- धर्मशाला
 
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ :- 
 
रोहित शर्मा (क), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (व्हीसी), आवेश खान
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली बॅट, हेल्मेट, जर्सी आणि कॅप क्रिकेट संग्रहालयाला दान केले

झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ५७ धावांनी पराभूत केले

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जाहीर

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

न्यूझीलंडचा एकदिवसीय कर्णधार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

पुढील लेख
Show comments