Daily Horoscope
✕

IND vs NZ: T20 मधील भारताचा सर्वात मोठा विजय, सलग चौथी मालिका जिंकली

Updated: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (22:51 IST)
 
टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने आयर्लंडचा 148 धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा T20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2010 मध्ये पाकिस्तानने त्याचा 103 धावांनी पराभव केला होता. गेल्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्याचबरोबर यंदा श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही जिंकली आहे.
 
शुभमन गिलने शतक झळकावले
भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. डॅरेल मिशेलने 35 आणि कर्णधार मिचेल सँटनरने 13 धावा केल्या. भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
 
कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि शुभमन गिलकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती, पण किशन पुन्हा एकदा अपयशी ठरला. तीन चेंडूत एक धाव घेत पॅव्हेलियनमध्ये परतला.
 
Edited By - Priya Dixit  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

पुढील लेख
Show comments