रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 15 मे 2017 (12:19 IST)

चॅम्पिंन्स ट्रॉफीत धोनीचा चौकार

भारताचा माजी कर्णधार कूल महेंद्रसिह धोनी 1 ते 18 जून या काळात इंग्लंड वेल्स मध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चौथ्या वेळा सहभागी होत आहे व त्याच्या गाठी असलेल्या मोठ्या अनुभवाता फायदा भारतीय टीमला होईल असेही सांगितले जात आहे. धोनी या सामन्यात भारतीय टीमचा कप्तान विराट कोहलीला मोलाची मदत करेल असेही समजते. या ट्रॉफीत भारताच्या अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग ही सहभागी असून तो 11 वर्षाच्या कालखंडानंतर ही ट्राफी खेळणार आहे. 2002 मध्ये त्याने केनियातून पहिली ट्रॉफी खेळली होती मात्र 2009 व 2013च्या चँम्पियन ट्रॉफी मध्ये तो खेळला नव्हता. भारतातर्फे खेळण्यासाठी खूपच उत्साह वाटत असल्याचे व भारतीय टीमची विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे युवराजने नुकतेच जाहीर केले आहे.