Festival Posters

MI vs RCB : आरसीबीने मुंबईवर तीन विकेट्सने विजय मिळवला

Updated: शनिवार, 10 जानेवारी 2026 (09:50 IST)
ALSO READ: पाचवी कसोटी 5 विकेट्सने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 4-1 असा अ‍ॅशेस जिंकला
महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या आवृत्तीची सुरुवात चांगली झाली आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा तीन विकेट्सने पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
ALSO READ: WPL च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना RCB शी होणार
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मुंबईने सजीवन सजना आणि निकोला केरी यांच्यातील 82 धावांच्या भागीदारीमुळे20षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने नॅडिन डी क्लार्कच्या 63 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर सात विकेट्सच्या मोबदल्यात 157 धावा केल्या आणि सामना जिंकला.
 
आरसीबीच्या ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने संघाला एक स्थिर सुरुवात दिली, परंतु शबनीम इस्माईलच्या गोलंदाजीवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना मानधना बाद झाली. यानंतर आरसीबीचा मधला क्रम पूर्णपणे कोसळला आणि कोणताही खेळाडू सातत्यपूर्ण फलंदाजी करू शकला नाही.

दयालन हेमलता (7 धावा), रिचा घोष (6 धावा) आणि राधा यादव (1 धाव) मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. असे वाटत होते की आरसीबीचा पराभव होईल. आरसीबीने फक्त 65 धावांमध्ये पाच विकेट गमावल्या आणि त्यांचा पराभव निश्चित दिसत होता. त्यानंतर नॅदिन डी क्लार्कने शानदार फलंदाजी केली.
ALSO READ: बांगलादेश भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळणार, आयसीसीने मागणी फेटाळली
तिने तिच्या दमदार फलंदाजीने सामना उलटा केला. तिने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांविरुद्ध ठामपणे उभे राहून 44 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 63 धावा केल्या. शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. या षटकात नदीनने दोन षटकार आणि दोन चौकार मारून आरसीबीचा विजय निश्चित केला. 
Edited By - Priya Dixit
 
 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार

ईस्ट झोनने दलीप ट्रॉफी २०२६ जिंकली; इशान किशनने १३ वर्षाची प्रतीक्षा संपवली

२०२६ च्या आशियाई खेळांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूंच्या निवासव्यवस्थेबाबत माहिती दिली

बीसीसीआयने रोहित यादवला ऑस्ट्रेलिया मालिकेतून वगळले, नवीन खेळाडूचीही घोषणा

२२ सप्टेंबरला ऐतिहासिक क्षण! भारत-जपान पहिल्यांदाच टी-२० क्रिकेट सामन्यात आमनेसामने

पुढील लेख
Show comments