Dharma Sangrah
✕

T20 World Cup 2022 टीम इंडियाचा दणदणीत विजय

Updated: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (18:21 IST)
 
 दक्षिण आफ्रिका तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाने गुरुवारी बांगलादेशवर 104 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वे विरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला. पण आता दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत स्थान मिळवले आहे. भारताच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी आफ्रिकन संघ तीन गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता, काही तासांनंतर ती दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. संघाचा निव्वळ रन रेट आता +5.200 आहे.
 
 गटातील इतर 4 संघांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ अव्वल स्थानावर होता, मात्र मानहानीकारक पराभवानंतर संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशचा निव्वळ रन रेट -2.375 आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सने अद्याप पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडलेले नाही.
 
 गुरुवारी झिम्बाब्वे आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध सामना खेळत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आज पराभूत होणाऱ्या संघाला उपांत्य फेरीतील वाटचाल खूपच अवघड आहे.पाकिस्तानला पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला होता, तर झिम्बाब्वेचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता आणि त्यांना एक गुण मिळाला होता.

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments