Festival Posters
✕

टीम इंडियाची दिवाळी

Updated: रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (07:31 IST)
 
तत्पूर्वी, मालिका जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या बाजूने मिळवला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना जिंकण्यासाठी भारताने संघात दोन बदल केले. धवल कुलकर्णीला वगळून त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघात परतला, तर हार्दिक पंड्याऐवजी फिरकी गोलंदाज जयंत यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 
गेल्या चार सामन्यांतील भारताच्या सलामीच्या जोडीची कामगिरी चांगली झालेली नाही. शनिवारी मात्र अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने ५६ चेंडूंत भारताला ४0 धावांची सलामी दिली. अजिंक्य रहाणे केवळ २0 धावांवर निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या मालिकेत अपयशी ठरून अनेकांच्या रोषास पात्र ठरलेल्या रोहित शर्माला अखेरच्या सामन्यात सूर गवसला. 
 
सुरुवातीस सावध पवित्रा घेणार्‍या रोहित शर्माने जम बसताच आपल्या भात्यातील फटक्यांचा वापर करायला सुरुवात केली. संघाचा उपकर्णधार विराट कोहलीसह त्याची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी ७६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी करून भारताचे शतक झळकावले. रोहित शर्माने लेग स्पिनर ईश सोधीची गोलंदाजी चांगलीच चोपून काढली. त्याने तीन उत्तुंग षटकारही ठोकले. ही जोडी जमली आहे, असे वाटत असतानाच रोहित शर्माला ट्रेण्ट बोल्टने ७0 धावांवर झेलबाद केले. मुंबईकर रोहित शर्माने ६५ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. 
 
या मालिकेत दोनदा नाबाद राहून टीम इंडियाला विजय मिळवून देणार्‍या विराट कोहलीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत ७६ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ६५ धावा केल्या. धोनीसह कोहलीने न्यूझीलंड गोलंदाजांवर चांगलीच हुकूमत गाजवली. कर्णधार -उपकर्णधाराने ९0 चेंडूंत ७१ धावांची भर घातली. धोनीने आक्रमक पवित्रा घेत चार चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ४१ धावा केल्या.
 
या दोघांनी टीम इंडियाला दोनशेच्या घरात आणून ठेवल्यावर मिचेल सँटनरचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात धोनी पायचित झाला. मनीष पांडेला भोपळाही फोडता आला नाही. संघाची धावसंख्या २२0 अशी असताना विराट कोहलीने सोधीच्या गोलंदाजीवर गपटीलकडे झेल दिला. कोहलीने ७६ चेंडूंत २ चौकार आणि एक षटकार ठोकून ६५ धावा केल्या. केदार जाधवने ३७ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद ३९ धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने २४ धावा करताना सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारीही करून चांगली साथ दिली. भारताने ५0 षटकांत सहा खेळाडू गमावून २६९ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेण्ट बोल्ट आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
     

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

स्मृती मंधानाला लवकरच महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता

सूर्यकुमार यादव मुंबई रणजी संघातून बाहेर

विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून राजीनामा दिला

IPL 2027 पूर्वी मोठी घोषणा : सौरव गांगुली सांभाळणार दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा

India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना आज लखनौ येथे खेळला जाणार

पुढील लेख
Show comments