बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: देहरादून , सोमवार, 26 डिसेंबर 2016 (10:59 IST)

ख्रिसमससाठी विराट-अनुष्का ऋषिकेशमध्ये

भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा हो प्रेमीजोडपे ख्रिसमसच्या सुट्ट्या साजर्‍या करण्यासाठी लपूनछपून ऋषिकेशमध्ये दाखल झाले आहे. विराट-अनुष्का चार्टर्ड विमानाने जॉली ग्रॅन्ट एअरपोँला पोहोचले. दोघेही लपूनछपून ऋषिकेशजवळील नरेंद्रनगरमधील आनंदा हॉटेलमध्ये पोहोचले. दोघांचा हा दौरा अतिशय गुप्तपणे ठेवण्यात आला होता. मात्र कॅमेर्‍याने त्यांना टिपलेच. अनुष्काचे उत्तराखंडसोबत एक वेगळे नाते आहे. तिचे आजी-आजोबा येथे राहतात. तर, विराट सध्या उत्तराखंडच्या पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर आहे.