Daily Horoscope
✕

Virat Kohli : विराट कोहलीने 500 व्या सामन्यात इतिहास रचला

Updated: शुक्रवार, 21 जुलै 2023 (12:11 IST)
 
विराट कोहली नाबाद 87 आणि रवींद्र जडेजा 36 धावांवर खेळत होते. म्हणजेच कोहली त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 व्या शतकापासून केवळ 13 धावा दूर आहे. 34 वर्षीय कोहलीने 161 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार मारले आहेत. त्याचवेळी रवींद्र जडेजाने आतापर्यंत 84 चेंडूंचा सामना केला असून त्याच्या बॅटमधून चार चौकार आले आहेत. जडेजा आणि कोहली यांनी आतापर्यंत पाचव्या विकेटसाठी 201 चेंडूत 106 धावांची भागीदारी केली आहे.
 
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे, जो त्याने शानदार खेळी खेळून संस्मरणीय बनवला आहे. कोहली आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या शानदार खेळीदरम्यान, कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत जॅक कॅलिसला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आला. या डावात विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या.  विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय स्तरावार सर्वाधिक धावा (25,548) करणारा 5 वा फलंदाज ठरला आहे. तसेच विराट कोहली WTC मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.

भारतीय फलंदाजांमध्ये विराटशिवाय केवळ रोहित शर्मालाच ही कामगिरी करता आली आहे. एवढेच नाही तर विराट या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 
 Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

India vs Zimbabwe वैष्णवी शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झिम्बाब्वेविरुद्ध ५ बळी घेत रचला विक्रम

भारताने तिसरा टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला

अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडला, नवा इतिहास रचला

जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करणार, ऋषभ पंतही खेळताना दिसणार

आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावाची तारीख जाहीर

पुढील लेख
Show comments