Biodata Maker marathi
✕

मोदींच्या सुनावणीस नकार!

Written By वार्ता
Updated: गुरूवार, 6 जानेवारी 2011 (12:50 IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी "आयपीएल'चे निलंबित आयुक्त ललित मोदींच्या चौकशीला स्थगिती देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) याचिका फेटाळून लावली. "आयपीएल'मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिस्तपालन समितीसमोर मोदी यांची चौकशी चालू होती. त्यानंतर चौकशी समिती बदलण्याची मागणी करतानाच मोदी यांनी चौकशीच्या कामकाजासच स्थगिती मिळविली होती. त्या निर्णयाला "बीसीसीआय'ने आव्हान दिले होते.

" ही याचिका आमच्यासमोर नको' अशा शब्दांत खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी सुनावणीस नकार दिला. सुट्टीतील न्यायालयासमोर गेल्या 27 डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये ही याचिका खंडपीठासमोर ठेवण्याची सूचना केली होती. यानंतर "बीसीसीआय'ने उच्च न्यायालयासमोर नव्याने याचिका दाखल केली आहे. आता ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर ठेवली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

Show comments