Marathi Biodata Maker

खिशात मावणारे फुगा हेल्मेट

दुचाकी वाहन चालविताना भारतात हेल्मेट वापरणे बंधनकारक केले गेले आहे. वाहन चालविताना छोटा मोठा अपघात झाला तर त्यात डोके सुरक्षित राहावे यासाठी हेल्मेट वापरणे केव्हाही श्रेयकर असले तरी हे हेल्मेट बरोबर बाळगणे मात्र जिकीरीचे होते. हेल्मेट सांभाळण्याची ही समस्या आता संपणार आहे कारण पँटच्या खिशात सहज मावेल असे हेल्मेट तयार करण्यात आले आहे.
 
स्पेनमधील क्लोस्का कंपनीने हे फोल्डेबल हेल्मेट तयार केले आहे. बाईक चालविताना ते वापरल्याने डोक्याचे संरक्षण होणार आहेच पण वापर संपल्यावर ते फोल्ड करून खिशातही सहज ठेवता येणार आहे. फोल्ड झाल्यावर ते सीडीच्या आकाराचे बनते. या हेल्मेटचे नामकरण फुगा असे केले गेले आहे. तीन तुकड्यात हे हेल्मेट असून पूर्ण उघडले की ते हेल्मेट बनते. हेल्मेटच्या टॉपवर दाबले की ते फोल्ड होते. याची सध्याची किंमत १०० डॉलर्स म्हणजे ६३०० रूपये आहे. या हेल्मेटच्या वापराला अमेरिकेने परवानगी दिली असल्याचेही समजते.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: मेस्माच्या इशाऱ्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

पुणे विमानतळावर अडीच कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मृत व्यक्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा प्रकरणी शिंदे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याविरोधात गंभीर एफआयआर दाखल

ओबीसी हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा

मेस्माच्या इशाऱ्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

पुढील लेख
Show comments