suvichar
✕

Indian Army Day 2026 : भारतीय लष्कर दिन

Updated: गुरूवार, 15 जानेवारी 2026 (09:05 IST)
 
कोण आहेत लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश कमांडरच्या ताब्यात लष्कर होते. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते. 1949 मध्ये, स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.
 
15 जानेवारीलाच आर्मी डे का असतो?
खरेतर, फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. करिअप्पा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे २ लाख सैनिक होते. करिअप्पा 1953 मध्ये निवृत्त झाले आणि 1993 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 
करिअप्पा यांच्या कामगिरी
करिअप्पा यांनी 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतर त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शल पद देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपान्यांना पराभूत केल्याबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मानही मिळाला होता.
 
भारतीय सैन्याची स्थापना
राजा महाराजांच्या कारकिर्दीत केव्हा झाली, प्रत्येक शासकाचे स्वतःचे सैनिक होते, परंतु ईस्ट इंडिया कंपनीने 1776 साली कोलकाता येथे भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती, ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले आणि शेवटी देशातील सैनिकांना भारतीय सैन्य म्हणून मान्यता मिळाली. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

प्राचीन परंपरांना आधुनिक साहित्याशी जोडल्याबद्दल कॅनेडियन लेखिका ॲन कार्सन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

महाराष्ट्रात १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालये सुरू होणार तर २३ महाविद्यालयांची क्षमता वाढणार

मुंबईत टाटा नगर कामगार कॅम्पमध्ये भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचा स्फोट

पुढील लेख
Show comments