ganesh chaturthi
✕

International Plastic Bag Free Day 2026 : आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस

Updated: गुरूवार, 2 जुलै 2026 (20:25 IST)
 
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस उद्देश
आपण दुकानातून अवघ्या काही मिनिटांसाठी प्लास्टिक पिशवी घेतो, पण ती पिशवी नष्ट होण्यासाठी ४०० ते १००० वर्षे लागतात. या प्लास्टिकमुळे जमीन, पाणी आणि हवा या तिन्हींचे गंभीर प्रदूषण होते. म्हणूनच, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर वाढवणे हा या दिवसाचा संदेश आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्या महासागर, नद्या, जंगले आणि माती प्रदूषित करतात, प्राण्यांसाठी प्राणघातक आहेत आणि कचराभूमीमध्ये शतकानुशतके विघटित होत नाहीत.  तसेच हा दिवस २००८-२००९ च्या सुमारास, प्रामुख्याने 'झिरो वेस्ट युरोप' आणि 'गाया' (ग्लोबल अलायन्स फॉर इन्सिनरेटर अल्टरनेटिव्ह्ज) यांसारख्या संस्थांनी सुरू केला होता. आता हा दिवस 'ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक' चळवळीचा एक भाग बनला आहे, ज्यामध्ये हजारो संस्था आणि लाखो लोक सामील आहे.
 
प्लास्टिकला सोपे आणि उत्तम पर्याय
आपल्या छोट्याशा सवयी बदलून आपण पृथ्वीला प्लास्टिकमुक्त करू शकतो:
कापडी पिशव्या : बाजारात किंवा भाजी आणायला जाताना घरातूनच कापडी पिशवी सोबत ठेवण्याची सवय लावा.
जूट/तागाच्या पिशव्या : या पिशव्या मजबूत आणि दिसायलाही सुंदर असतात.
कागदी पिशव्या : सुक्या वस्तू किंवा किराणा आणण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करा.
 
या दिवसासाठी आकर्षक घोषणा 
"प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा!"
"कापडी पिशवी वापरूया, वसुंधरेला प्लास्टिकमुक्त करूया."
"प्लास्टिकचा नकार, हाच निसर्गाचा खरा सत्कार!"
 
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

4 वर्षांनी वेगवान गोलंदाज भूवनेश्वरची टीम इंडियात एन्ट्री

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले! पुण्यात नेमकं काय घडलं, पुढे कोणता निर्णय होणार?

दुष्काळाचा फटका: शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना मोठा धक्का; कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत

राजधानी दिल्लीत राहुल गांधींसह 250 खासदार ताब्यात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात श्रेयस अय्यरने शतक झळकावत कोहलीचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments