Daily Horoscope

इर्शाळवाडी : NDRF काय आहे? ते कसं काम करतं? आपत्तींच्या वेळी नेहमी NDRF ला पाचारण का केलं जातं?

Updated: गुरूवार, 20 जुलै 2023 (09:59 IST)
 
हे जाणून घेण्यासाठी पुण्याच्या तळेगाव येथील प्रशिक्षक, कृती, प्रशासन आणि जनसंपर्क विभागात कार्यरत असलेले सेकंड-इन-कमांड सच्चिदानंद गावडे यांच्याशी बीबीसी मराठी प्रतिनिधी हर्षल आकुडे यांनी बातचीत केली.
 
1. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005
देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.
 
त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.
 
2. NDRFची संरचना
हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात यावेत, असे सरकारचे निर्देश आहेत.
 
स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती 12 करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.
 
आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.
 
3. महाराष्ट्रात 18 तुकड्या
महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत - तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात 14 तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते.
 
सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र NDRFचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.
 
4. निवड आणि प्रशिक्षण
आता प्रत्येक आपत्तीत लोकांचे जीव वाचवण्याचं काम किती प्रेरणादायी वाटतं ना? मग NDRFमध्ये कसं जाता येईल, हेही पाहा...
 
भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRFमध्ये निवडण्यात येतं. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते.
 
5. कोणकोणत्या आपत्तींशी सामना करावा लागतो?
जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.
 
प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
 
6. जनजागृती कार्यक्रम
मात्र NDRFचं काम केवळ दुर्घटनेतून लोकांना वाचवणं इतकंच नाही, तर लोकांना एखाद्या आपत्तीप्रसंगी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती देणंही आहे. यासाठी त्यांना राज्य तसंच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांसोबत समन्वय राखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं.
 
तसंच राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड, NCC आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी शाळा-महाविद्यालयात 15 दिवसांचे शिबीर घेण्यात येतात.
 
आपत्तीच्या वेळी NDRFला जाण्यास उशीर झाल्यास नागरिकांना स्वतः त्यातून मार्ग काढता यावा, यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेतली जाते.
 
अनेक वेळेला किनारपट्टीच्या भागात जेव्हा एखादं चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला जातो, तेव्हा या तुकड्या गावोगावी जाऊन वस्तीतील लोकांना सतर्क करतात, परिसर रिकामा करण्यात मदत करतात आणि ओढवू शकणारी हानी आधीच टाळतात.
 
7. 'आपदा सेवा सदैव'
NDRFने 'आपदा सेवा सदैव' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतं. देशात तसंच विदेशात आतापर्यंत अनेक बचावकार्यांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यातून आतापर्यंत सुमारे 4 लाख 70 हजारांहून अधिक नागरिकांचा जीव वाचवल्याची माहिती NDRFच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
 
जपान त्सुनामी 2011, नेपाळ भूकंप 2015 या आंतरराष्ट्रीय बचावकार्यामध्ये NDRFने कर्तव्य बजावलं.
 
देशातील जम्मू-कश्मीर, चेन्नई, केरळ, आसाम याठिकाणचे पूर तसंच महाराष्ट्रात मुंब्रा इमारत दुर्घटना, माळीण भूस्खलन, ठाणे रसायन कारखान्यातील आग, यांसारख्या घटनांमध्ये NDRFने विशेष उल्लेखनीय कार्य केलं होतं.
 
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या खाडीत आलेल्या अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये NDRFची टीम आजही काम करत आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments