suvichar
✕

जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधलेले आयुष्य

Updated: बुधवार, 27 जानेवारी 2021 (09:44 IST)
 
अडीच अक्षरांची कान्ता
अडीच अक्षरांची दुर्गा
अडीच अक्षरांची ईच्छा 
नी अडीच अक्षरांचा योध्दा!

अडीच अक्षरांचे ध्यान
अडीच अक्षरांचा त्याग
अडीच अक्षरांचेच कर्म
नी अडीच अक्षरांचाच धर्म!
 
अडीच अक्षरांत भाग्य
अडीच अक्षरांत व्यथा
अडीच अक्षरांतच व्यर्थ
बाकी सारे मिथ्या!
 
अडीच अक्षरांत सन्त
अडीच अक्षरांचा ग्रंथ
अडीच अक्षरांचा मंत्र
नी अडीच अक्षरांचे यंत्र!
 
अडीच अक्षरांची तुष्टी
अडीच अक्षरांचीच वृत्ती
अडीच अक्षरांतच श्र्वास
नी अडीच अक्षरांतच प्राण!
 
अडीच अक्षरांचा मृत्यू
अडीच अक्षरांचाच जन्म
अडीच अक्षरांच्याच अस्थि
नी अडीच अक्षरांचाच अग्नि!
 
अडीच अक्षरांचा ध्वनी
अडीच अक्षरांचीच श्रुती
अडीच अक्षरांचा शब्द
अडीच अक्षरांचाच अर्थ!
 
अडीच अक्षरांचा शत्रू
अडीच अक्षरांचा मित्र
अडीच अक्षरांचेच सत्य
अडीच अक्षरांचेच वित्त!
 
जन्मापासुन मृत्युपर्यंत
अडीच अक्षरांत बांधलेले
आयुष्य हे मानवाचे
नाही कुणा उमगले!!

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: मालेगाव-डोंगराळे बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; १६ ऑक्टोबरला निर्णय

मुंबईत टाटा नगर कामगार कॅम्पमध्ये भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचा स्फोट

''मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारापुढे नाते हरले''; लोणावळ्यात आजोबांनी नातवावर गोळी झाडली

मोबाइलमध्ये Storage Full होत असेल तर हे ५ फोल्डर आधी तपासा

१,६०० उपग्रह आणि २३ ग्राउंड स्टेशन्स; जिओने जमिनीवरून आकाशात कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी झेप घेतली

पुढील लेख
Show comments