deepawali
✕

संत गाडगेबाबा पुण्यतिथी : गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार

Updated: शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (12:11 IST)
 
गाडगे महाराजांची गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. दीन, दुर्बळ, अनाथ, अपंगांची ते नेहमीच सेवा करत असत.
 
"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकारा कडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचा साठी देव होते. त्यांच्या सेवेमध्येच जास्तच जास्त काळ वेळ रमायचे.
 
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेष असे.
त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले "देव दगडात नसून तो माणसांत आहे" हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिले.
 
संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करत असत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या.
 
बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण प्रवाहात दिसते. त्यांची मृत्यू दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी झाली.
 
गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार
 
* चोरी करू नका.
* सावकाराकडून कर्ज घेऊ नका.
*  व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
*  देवा धर्माच्या नवा खाली प्राणी हत्या करू नका.
* जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका.
*  श्रीमंत गरीब असा भेद करू नका.

Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

महाराष्ट्र माथाडी कामगार परीक्षेत हेराफेरीचा सुषमा अंधारेंचा आरोप

LIVE: एसटी कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वी संपाचा अल्टिमेटम दिला

महाराष्ट्र एफडीएने मसाल्यांमधील रासायनिक भेसळीवर कारवाई केली, दुकानांमधून नमुने घेतले जाणार

Toyota Glanza Facelift : टोयोटाची परवडणारी कार लॉन्च, वैशिष्टये जाणून घ्या

भारतीय महिला क्रिकेट संघ आता मैदानात उतरणार, पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल, हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments