Dharma Sangrah
✕

World Milk Day 2022 जागतिक दूध दिवस 2022 थीम, महत्त्व आणि काही तथ्ये

Updated: बुधवार, 1 जून 2022 (09:13 IST)
 
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित काही इतर तथ्ये
गेल्या तीन दशकात जगात दुधाचे उत्पादन 59 % वाढले आहे. 1988 मध्ये उत्पादन 530 दशलक्ष टन होते आणि 2018 मध्ये 843 दशलक्ष टन झाले.
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात 22 टक्के वाटा आहे. त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.
1970 पासून दूध उत्पादनाचा सर्वाधिक विस्तार दक्षिण आशियातील देशांमध्ये झाला. जे विकसनशील देशांमध्ये दोष उत्पादन वाढीचे मुख्य स्त्रोत आहे.
आफ्रिकेतील दूध उत्पादन विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच कमी वेगाने वाढत आहे, मुख्यतः गरिबी आणि हवामान बदलामुळे.
चीन, इटली, रशिया, मेक्सिको, अल्जेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये सर्वाधिक दुधाचा तुटवडा आहे.
गायीचे दूध हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे दूध आहे. आरोग्यासाठी असे मानले जाते की गाईचे दूध इतर प्रकारच्या दुधापेक्षा चांगले असते.
जगभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी दुग्धजन्य पदार्थ हे उत्पन्नाचे मौल्यवान स्त्रोत आहेत.
जगातील अनेक देशांच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा दूध हा महत्त्वाचा भाग आहे.
 
भारतातील जागतिक दूध दिवस
फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन कॉर्पोरेट स्टॅटिस्टिकल डेटाबेस (FAOSTAT) च्या उत्पादन आकडेवारीनुसार, भारत दुग्ध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अंडी उत्पादनात दुसरा आणि मत्स्य उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो.
देशातील दूध उत्पादनात आणखी वाढ करण्यासाठी, भारत सरकार अनेक केंद्र पुरस्कृत योजना राबवत आहे. तसेच 2014 मध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचे उद्दिष्ट देशी जातींचा विकास आणि संवर्धन, गोवंश लोकसंख्येचे अनुवांशिक सुधारणा आणि दुग्धोत्पादन आणि गायींची उत्पादकता वाढवणे हे आहे.
 
दुग्धव्यवसाय विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता वाढवणे आणि संघटित दूध खरेदीतील वाटा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. दूध सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्थांचे समर्थन: ही योजना दुग्ध व्यवसायांवर केंद्रित आहे आणि राज्य सहकारी संस्था आणि संघांना भांडवली कर्ज देण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

'अर्नब' चक्रीवादळामुळे हाय अलर्ट! ६४ गाड्या रद्द; अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

LIVE: नागपूरमध्ये अचानक भूकंपाचा धक्का बसला

१ नोव्हेंबरपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही

महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या ८३,००० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळणार; सरकारने ३९१.०२ कोटी रुपयांना मंजुरी दिली

तामिळनाडूतील थेनी तुरुंगातून पळून गेलेल्या १७ कैद्यांपैकी १३ जणांना अटक, निष्काळजीपणाबद्दल ९ तुरुंग कर्मचारी निलंबित

पुढील लेख
Show comments