Dharma Sangrah

World Sparrow Day 2026 : जागतिक चिमणी दिवस

Updated: शुक्रवार, 20 मार्च 2026 (07:56 IST)
तसेच भरतात 5 प्रजातींच्या चिमण्या आढळतात व त्यामध्ये स्थलांतर करणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. तसेच जगामध्ये देखील 24 प्रकारच्या चिमण्या आढळतात. बहुतांश प्रजातींची यापैकी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. 13 व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. ही परिषद गुजरातच्या गांधीनगर येथे 2020 मध्ये झाली होती. हा अहवाल देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून तयार केला आहे. 

तसेच सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांनी हा निष्कर्ष काढला. पक्षांच्या 867 प्रजातींचा समावेश प्रकाशित अहवालात  करण्यात आला होता. गेल्या 25 वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट या अहवालामध्ये नोंदविली गेली आले. तसेच या अहवालात गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल 79%घट झाल्याचेही म्हटले आहे. अभ्यासकांचे मत आहे की कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक आहे.

शहरी भागातून मोठ्या प्रमाणात चिमण्यांची संख्या कमी झाली असून चिमण्यांचे प्रमाण ग्रामीण भागातही  कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. चिमण्यांची घटती संख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. विविध परिसंस्थांवर चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम दिसत आहे. तसेच चिमण्याची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम शेतातील पिकांवर देखील झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असतात. पण आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून पिक टिकून राहण्यासाठी हानिकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे. म्हणून  चिमणीच्या संवर्धनासाठी उपाय सांगण्यात आले. नैसर्गिक परिवास चिमण्यांच्या वावरासाठी निर्माण करणे. तसेच लोकांना चिमणी वाचवण्यासाठी जागृत करने, पर्यावरणाचे महत्व समजवून सांगणे, म्हणून याकरिता 20 मार्च रोजी 'जागतिक चिमणी दिन' साजरा करतात. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments