Dharma Sangrah
✕

मदनिका

Updated: बुधवार, 30 जानेवारी 2008 (16:00 IST)
कार्ला ब्रुनी या मदनिकेने सध्या जगभराची हवा ' गरम' केली आहे. माध्यमांना चघळायला मजकूर तर ती पुरवत आहेच. पण सर्वसामान्यांनाही तिच्याविषयी उत्सुकता आहे. एकेकाळच्या या सुपरमॉडेलने आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांनाच गटवल्याने सहाजिकच याचीही ' गरमागरम' चर्चा सुरू आहे.

फ्रान्स हा तसा रंगेल लोकांचा देश. पॅरीसच्या रात्री तर प्रसिद्धच आहेत. तर अशा देशाच्या अध्यक्षांनाही या रंगेलपणाचं वारं लागलं आणि पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊन सारकोझींनी कार्लाशी घरोबा केलाय. कार्लाशी त्यांनी अजून लग्न केलं नसलं तरी ते त्या विचारात आहेत. पण अधिकृत लग्न न झाल्याने सध्या तरी त्यांचं हे प्रकरण हे लफड्यातंच मो़डलं जातंय. राजकीय कोंडी होऊनही सारकोझींनी आपल्या या 'मैत्रिणी'ला सोडलेले नाही.

नुकतेच भारतात आलेल्या सारकोझींनी कार्लाला आणले नाही, अन्यथा भारतीय प्रशासनाची पंचाईत झाली असती. कारण कार्ला काही त्यांची अधिकृत बायको नाही. त्यामुळे तिला फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा दर्जा देता येत नव्हता. पण अखेरीस कार्लानेच आपण भारतात यायला उत्सुक असलो तरी आताच येणार नाही, असे सांगून भारतीय अधिकार्‍यांची चिंता मिटवली.

जगभरात खळबळ माजविणारी ही कार्ला आहे तरी कोण असा प्रश्न भारतीयांना पडल्याशिवाय राहिला नसेल.

एकेकाळची सुपरमॉडेल कार्ला म्हणजे सौंदर्याचा अ‍ॅटमबॉम्ब आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात उतरल्या उतरल्या तिने आपले बस्तान बसविले. मॉडेलची सुपरमॉडेल कधी झाले ते कळलेच नाही. ती मागेल तेवढे पैसे तिला दिले जात असतं, एवढी तिची या क्षेत्रात वट होती. या यशाबरोबरच स्वैरपणाही तिच्या आयुष्याला दिला. फॅशनजगतात वावरत असताना तिच्या संगीत, चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील बड्या हस्तींशी ओळख झाली. आणि मग तिच्या लफड्यांची मालिकाही सुरू झाली.

मिक जॅगर, एरिक क्लॅप्टन, केव्हिन कोस्टनर, व्हिन्सेंट पेरेझ, डोनाल्ड ट्रंप व फ्रान्सचे माजी पंतप्रधान लॉरेन फेबिया अशी अनेक नावे तिच्या नावापुढे जोडली गेली. तिला त्याचं काहीच वाटत नाही. एका मुलाखतीत तिनं सांगतिलं होतं, की एकाच पुरूषासोबत ती फार काळ राहू शकत नाही. प्रेम वगैरे दीर्घकाळ चालतं. पण ओढ काही दिवसच टिकते. माझंही तसंच आहे.

मॉडेलिंगच्या विश्वाची सम्राज्ञी असलेल्या कार्लाने ९० च्या दशकात या झगमगत्या विश्वातून काढता पाय घेतला. पण तरीही तिचे नाव वेगवेगळ्य कारणांनी माध्यमांत येऊ लागले. फॅशनविश्वाला अलविदा केल्यानंतर कार्ला पॉप गायिका झाली. तिचा एकेकाळचा प्रियकर व संगीतकार ज्यॉं लुई बर्तिगनॅक याच्या दिग्दर्शनाखाली एक अल्बम केला. तिचा हा पहिलाच अल्बम चांगलाच हीट ठरला. तिचा दुसरा अल्बम गेल्या वर्षी आला. तोही दणकून गाजला. आतापर्यंत तिच्या अल्बमच्या वीस लाख सीडी खपल्या आहेत. यावरून तिची लोकप्रियता लक्षात यावी.

तिच्या बहुरंगी आणि बहुढंगी आयुष्यावर कादंबरीही लिहिली गेली आहे. त्यासाठीही तिचं लफडंच कारणीभूत ठरलं. फ्रान्समधील प्रख्यात लेखक ज्यॉ पॉल एन्थोवेन यांच्यासह रहाता रहाता कार्लाचे सूत त्यांच्याच 'सूता'शी म्हणजे रफाएलशीही जुळले. विशेष म्हणजे रफाएलचेही लग्न झाले होते. त्याची बायको म्हणजे प्रसिद्ध लेखिका बर्नांड हेन्री लेवीची मुलगी. कार्लाने रफाएलना घटस्फोट घ्यायला लावला. तिला रफाएलपासून एक मुलगीही झाली. पण हे लग्नही अल्पायुषी ठरले.

कार्लामुळे झालेली आयुष्याची चित्तरकथा रफाएलची माजी पत्नी लेवीने 'नथिंग सिरीयस' नावाच्या एका कादंबरीत मांडली आहे. एक विषकन्या एका लग्न झालेल्या पुरूषाला आपल्या जाळ्यात ओढते, असे या कादंबरीचे कथानक आहे.

तर अशी ही कार्ला सदध्या सारकोझींबरोबरच्या लफड्यामुळे चर्चेत आली आहे. सारकोझीही हाही चांगलाच रंगेल माणूस आहे. त्यांनी दुसर्‍या पत्नीला घटस्फोट दिला आणि कार्लाशी त्यांचे लफडे अधिकृतरित्या सुरू झाले. ही गोष्ट गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरमधली. डिसेंबरमध्ये तर ते खुलेआम तिच्याबरोबर फिरू लागले. माध्यमांनीही रंगवून रंगवून त्याच्या बातम्या केल्या. ख्रिसमसपूर्वी दोघेही पॅरीसच्या डिस्नेलॅंडमध्ये हातात हात घालून फिरत होते. सारकोझींनी यंदाची सुटी मध्य-पूर्वेत कार्लासोबतच घालवली.

सारकोझी कार्लाच्या बाबतीत गंभीर आहेत. त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. पण त्यांचे लग्न झालेय अशा वावड्याही मीडीयात येताहेत. खरे काय ते त्यांनाच माहित.

छायाचित्र कार्ला ब्रुनी डॉट कॉम मधून साभार....

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

Show comments