Biodata Maker marathi
✕

विकासाचा विजय, दहशतवादाचा पराभव

- आलोक मेहता

Updated: मंगळवार, 9 डिसेंबर 2008 (15:10 IST)
राजकीय तज्ज्ञांचे अंदाज पुन्हा एकदा चुकीचे सिध्द झाले आहेत. मुंबईतील अतिरेकी हल्ल्याचे पडसाद मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगडच्या मतदानात दिसलेच नाहीत. युवक, महिला, दलित किंवा अल्पसंख्याक मतदारांनी निवडणुकीत विचारपूर्वक पक्ष आणि उमेदवारा ंनी मतदान केले आहे. यामुळेच इंग्रजांच्या थाटात पाच वर्ष राज्य करणार्‍या महाराणी वसुंधरा राजेंच्या 'राजेशाही'ला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. राजस्थानातील महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान करुन सरकार बदलले. दुसरीकडे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतरही सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करणार्‍या अशोक गहलोत यांचा विजय महत्त्वाचा ठरावा.

छत्तीसगडमध्येही दहशतवादाचे सावट होतेच. नक्षलवादी हिंसा, कॉंग्रेसमधील एका गुन्हेगारी गटाची दहशत या निवडणुकीतही प्रभाव टाकणारी ठरली. पण सामान्य जनता अमेरिकेतील असो की छत्तीसगडमधील, ती शांतता आणि विकासालाच महत्व देते. याचा अनुभव येथील निवडणुकीत आला. भाजपचे रमणसिंह यांनी पक्षातील गटबाजी आणि गंभीर सामाजिक आर्थिक आव्हानांसमोर विकासाला महत्व दिले. त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झाला.

मध्य प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी दबाव आणि गटतटाचे राजकारण केले. दुसरीकडे अनुनभवी असणार्‍या शिवराजसिंह चौहान यांनी विकासालाच महत्व दिले. जनतेनेही त्याच जोरावर मतदान केले. मुंबईतील अतिरेकी घटनेमुळे दिल्लीही हादरली होती. यामुळे राजकीय तज्ज्ञ, माध्यमे याचा फटका कॉंग्रेसला बसून भाजपला फायदा होईल असे भाकित वर्तवत होते. पण मतदारांनी काँग्रेसपेक्षा शीला दीक्षित आणि त्यांच्या सरकारच्या कामाला महत्व दिले.

मिझोराममध्ये वर्षांनुवर्ष हिंसा आणि दहशतवादाचा प्रभाव राहिला आहे. तेथील प्रादेशिक पक्ष असलेल्या एमएनएफने सलग दहा वर्षे एकछत्री राज्य केले. परंतु, मतदारांनी हिमतीने आणि धैर्याने काँग्रेसला मतदान करून मोठे बहुमत दिले. जगातील लोकशाही राष्ट्रांमध्ये या प्रकारची परिस्थिती आणि राजकीय विचारधारा कुठेही नाही. स्वतंत्र लोकशाही आणि विकासाची अपेक्षा करणार्‍यांचा हा विजय आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

Show comments