Daily Horoscope
✕

फुलाफुलात हासते मराठी

Updated: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (12:29 IST)
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 
आमुच्या मनामनात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदने मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
 
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्या रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढ्ते मराठी
 
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
 
येथल्या दरीदरीत हिंड्ते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
 
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
 
- कवी सुरेश भट

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

इस्लामी कायद्यातील 'ताझीर' नियम काय आहे? ज्याअंतर्गत दोन बांगलादेशींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली?

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात एक लाख भगवे झेंडे फडकवले जाणार

नांदेडमध्ये १.०२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹८६१.५६ कोटी जमा; कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर

भंडारा येथे विजयादशमीच्या उत्सवात 'महाप्रसाद' खाल्यानंतर ४०० जण आजारी तर १६ जणांची प्रकृती गंभीर

नागपूर: आई-वडिलांमधील वादामुळे १२ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबावर शोककळा

पुढील लेख
Show comments