Daily Horoscope
✕

५ मिनिटांत ऑफिससाठी ४ सोप्या स्टायलिश हेअरस्टाईल करा आणि प्रोफेशनल लूक मिळवा

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2026 (13:30 IST)
प्रो-टिप: पोनीटेलमधील एक केसांची बट घेऊन ती रबर बँडभोवती गुंडाळा आणि बॉबी पिनने सुरक्षित करा, जेणेकरून रबर बँड दिसणार नाही आणि लूक अधिक स्टायलिश वाटेल.
२. क्लासिक फ्रेंच ट्विस्ट किंवा बनाना बन (Classic French Twist / Banana Bun)
जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे नसतील आणि एकदम नीटनेटका लूक हवा असेल, तर हा अंबाडा उत्तम पर्याय आहे.
कशी करावी: सर्व केस मागे घ्या आणि एका बाजूला वळवून वरच्या दिशेने फिरावा. त्यानंतर यु-पिन्स किंवा क्लचरच्या मदतीने तो व्यवस्थित सेट करा.
फायदा: हा लूक वेस्टर्न सूट्स किंवा फॉर्मल कुर्तीवर अतिशय कॉर्पोरेट वाटतो.
३. हाफ-अप पफ किंवा हाफ पोनी (Half-Up Puff / Half Ponytail)
ज्यांना केस पूर्ण बांधायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे.
कशी करावी: कानाच्या वरच्या बाजूने दोन्ही कडून थोडे केस घ्या. समोरच्या केसांना हलकासा पफ (फुगवटा) देऊन मागे क्लिप किंवा छोट्या रबर बँडने बांधा. बाकीचे केस पाठीवर मोकळे सोडा.
फायदा: यामुळे चेहऱ्याला एक फ्रेश लूक मिळतो आणि केस डोळ्यांवर किंवा चेहऱ्यावर येत नाहीत.
४. मेसी लो बन (Messy Low Bun)
शुक्रवारच्या कॅज्युअल किंवा सेमी-फॉर्मल लूकसाठी हा अंबाडा अगदी योग्य आहे.
कशी करावी: केसांना मागे नेऊन साधी पोनीटेल बांधा. शेवटच्या वेढ्यात केस पूर्ण बाहेर न काढता अर्धे आतच राहू द्या. उरलेले केस त्याभोवती गुंडाळून पिन्स लावा. चेहऱ्याच्या बाजूने एक-दोन बटा मोकळ्या सोडा. 

ऑफिस हेअरस्टाईल करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
हेअर सीरम वापरा: सकाळी उठल्यावर केस विस्कळीत किंवा कोरडे वाटल्यास थोडे सीरम लावा. यामुळे केसांना चमक येते आणि हेअरस्टाईल नीट बसते.
ॲक्सेसरीज साध्या ठेवा: ऑफिससाठी रंगीबेरंगी किंवा चमचमणाऱ्या क्लिप्स वापरणे टाळा. नेहमी काळ्या, ब्राऊन किंवा न्यूड रंगाचे रबर बँड्स आणि पिन्स वापरा.
ड्राय शॅम्पू : जर केस तेलकट असतील आणि धुवायला वेळ नसेल, तर ड्राय शॅम्पूचा वापर करा. यामुळे केसांना झटपट व्हॉल्युम मिळतो आणि हेअरस्टाईल करणे सोपे जाते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दिवसातून फक्त ४ मिनिटे व्यायाम करा; कमी वेळेतही मिळू शकतात आरोग्याला हे फायदे

नैतिक कथा : मौल्यवान महाल आणि अहंकारी राजाची गोष्ट

सोन्याच्या साखळ्या आणि कानातले घरच्या घरी कसे स्वच्छ कराल? दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत

कढीपत्त्याचे रोप वारंवार सुकते? हिरवेगार आणि दाट ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

बाहेरून लाल आणि गोड व रसरशीत सफरचंदं खरेदी करण्याच्या ५ टिप्स वाचा

पुढील लेख
Show comments