Dharma Sangrah
✕

तरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन

Updated: शुक्रवार, 30 मार्च 2018 (11:22 IST)
 
ब्राईट शेड्स : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते, ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत असेल. सध्या पिवळा, ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स "इन" आहेत. 
निवड : "लिवा" खासियतच ही आहे कि यामध्ये तयार होणारे कपडे कोणत्याही व्यक्तीला उठावदार दिसतील. आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टीनुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे. या फ्लोरल प्रिंट डिझाईन्स मध्ये काहीसा "रेट्रो" टच असल्याचे आपल्याला जाणवेल. 
मल्टिपल आऊटफिट्सचा समावेश : पूर्वी फक्त "वन पीस" किंवा "फ्रॉक" पेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती. फिक्कट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट आपल्याला स्टायलिश लूक देऊन जातो. 
वेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषा रेषांचे प्रिंट्स सुद्धा चर्चेत होते. आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे. पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनमध्ये अशा प्रिंटचे कपडे आकर्षित करणारे आहेत. 
फ्लुइड फॅशन : फ्लोरल प्रिंट्समध्ये आपल्याला कम्फर्टेबल अशाच कपड्यांचा वापर करण्यात यायचा. यामध्ये सिल्क आणि हलक्या वजनांच्या कापडाचा विशेषतः समावेश असायचा. "लिवा" हे नैसर्गिकरित्या तयार केलेले व्हिसकोस कापड या डिझाईन्समध्ये खासकरून वापरले जाते, जेणेकरून या कपड्यांमध्ये आपण अधिक कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्ट राहू. 
असं म्हणतात की आपण वेळेनुसार आपली फॅशन बदलत असतो पण "लिवा" मुळे पूर्वी फेमस असलेली ड्रेसिंग स्टाईल आणि डिझाईन्स आपल्याला नव्याने "रेट्रो लाईफस्टाईल" मध्ये अनुभवायला मिळत आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments