ganesh chaturthi
✕

Summer Clothes : हॅपी कूल समर

Updated: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (23:08 IST)
 
उन्हाळ्यात येणारा घाम, त्याचा होणारा त्रास यामुळे काहीतरी हटके फॅशन ट्राय करणे थोडेसे अवघड असते. ऋतुबदलानुसार कपड्यांचा अंदाज बदलत असतो. काही फॅशन अशी असते की, जी दरवर्षी फॅशन ट्रेंडमध्ये इन असते. त्यामुळे सध्याच्या गर्मीच्या सीजनमध्ये नेहमी एव्हरग्रीन असणारा फॅशनेबल ट्रेंड कूल लूक देणारा ठरत आहे.
 
समर क्लोथ्स
उन्हाळ्यात उष्णतेला मात देण्यासाठी आपण फिकट रंगाचे आणि सुटसुटीत कपडे निवडत असून यामध्येसुद्धा विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी विविध स्टाइलिश आणि क्लासी आऊटफिट उपलब्ध असून त्याला शोभणार्‍या ऍक्सेसरीझची निवड केल्याने हटके लूक मिळतो. पार्टी लूकसाठी प्रिंटेड शर्टससारखे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ट्राऊजरमध्ये वाईड लेग लिनन ट्राऊजरची क्रेझ असून, हे ट्राऊजर पार्टीत आणि कॅज्युअल म्हणून वापरता येतात.
 
क्रॉप टॉप
सैलसर आणि सामान्य टॉपच्या तुलनेत थोडेसे शॉर्ट असणारे क्रॉप टॉपची सध्या चलती दिसून येत आहे. जीन्स्‌, स्कर्ट आणि हाय व लोवेस्ट पँटवर हे आकर्षक दिसतात. क्रॉप टॉपचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रत्येक तरुणीला शोभून दिसतो. जीन्स्‌ किंवा हॉट पँटवर क्रॉप टॉप चांगले दिसतात.
 
पेस्टल प्रिंटस्‌
या सीजनमध्ये पेस्टल रंगांचे ट्रान्सपरंट, प्रिंटेड फॅब्रिक ड्रेसेस स्टायलिश दिसू शकतात. कारण हे लाइटवेट, कूल असा लूक देतात. पेस्टल कलर्समध्ये फ्लोरल प्रिंटेड टॉप, स्लीव्हलेस टॉप, शिफॉन व जॉर्जेटमधील ड्रेस ट्रेंडी आणि स्टायलिश दिसू शकतात.
 
प्रिंटेड शर्टस्‌
सध्याच्या समर सीजनमध्ये प्रिंटेड शर्टस्ला अधिक पसंती मिळत आहे. यामध्ये पाने, एबस्ट्रक्ट पॅटर्न, प्राणी, पक्षी आणि मिलेट्रीच्या डिझाइन्समुळे याला बाजारात अधिक मागणी दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वी फक्त पार्टीसाठी वापरण्यात येणारी ही प्रिंटेड शर्टसची फॅशन आता ऑफिससह विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आरामदायी कपडे, फुटवेअर आणि दागिने निवडण्याच्या टिप्स

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

या योगासनाने पोटावरील चरबी कमी होईल, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

साखरपुड्यासाठी साडी निवडताय? हे पर्याय नक्की पहा! Saree Options Engagement

पुढील लेख
Show comments