Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परिपूर्ण साडी, बांधणीची साडी

Updated: मंगळवार, 8 मार्च 2016 (17:29 IST)

बांधणीची साडी म्हणजे एकाच कापडावर रंगकाम करून त्या रंगाच्या अनेक रंगात स्वतंत्र रंगसंगती निर्माण करणारी साडी होय. साडी इतकी आकर्षक असते की, तिला पाहिल्यावर ती विकत घेण्याची लालसा महिलांमध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

धावत्या युगात साडीची जागा स्कर्ट, मीडीने घेतली असली तरी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या साडीचे महत्त्व आजही कायम आहे. एवढेच नाही तर आजही हिंदी़, मराठी चित्रपटात व दूरदर्शनवरील मालिकेत या साड्यांना विशेष मागणी आहे. मात्र रेशीम धागा, रंग व त्याला लागणार्‍या वस्तुच्या दिवसेंदिवस किंमती वाढत असल्याने बांधणी साठी व्यवसायावर संक्रात आली आहे. त्यामुळे बांधणीच्या साडीची ‍किंमत गगणाला भिडली आहे.

आधुनिक पद्धतीची बांधणी साडी आता विविध रंगात आणि डिझाईनमध्ये बाजारात अवतरली आहे. पूर्वी केवळ दोन रंग आणि कमळाचे फूल किंवा पदके यातूनच बांधणीची साडी तयार केली जात होती. लाल आणि काळ्या रंगातील बांधणीची साडी अनेकांना आकर्षित करत होती. विशेषत: बांधणीची साडी सर्वाधिक गुजरात आणि राजस्थानमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

बांधणीच्या साडीत वापरण्यात येणारे रेशीम धागे आणि स्पॉट स्वरुपात केलेले धब्बे अत्यंत सुंदर दिसतात. विशेषत: हिंदू धर्मात आणि जैन धर्मात बांधणीची साडी विशिष्ट धार्मिक सोहळ्यामध्ये हमखास नेसण्याची प्रथा आहे.

बांधणीची साडी नऊ आणि सहा मीटरमध्ये उपलब्ध असते. पूर्वी केवळ कापसाच्या धाग्यापासून बांधणीची साडी तयार होत असे. आता रेशीम आणि कृत्रीम धागे वापरुन देखील साडी बांधणी स्वरुपात उपलब्ध असते, हे विशेष. साडीला रंगकाम करताना हलक्या रंगाबरोबरच गडद रंगाचे कॉम्बीनेशन, हे या साडीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल.

कार्पोरेट क्षेत्रात मात्र बांधणीच्या साडीने अद्याप प्रवेश केला नसला तरी दूरदर्शनवरून दाखविल्या जाणार्‍या अनेक मालिकांमध्ये या साडीला मानाचे स्थान आहे. बांधणीच्या कापड्याचे ड्रेस आणि जिन्स वरील शॉर्ट टॉप यासाठी बांधणी मटेरियलला विशेष मागणी आहे. पारंपरिकता आणि आधूनिकतेची फॅशन म्हणूनच बांधणीकडे पाहिले जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये बांधणीच्या साड्यांची मोठी बाजारपेठ आहे.

( महान्यूज)
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करायची? कॉफी Ice Cubes ठरतील फायदेशीर

पावसाळी आजारांपासून बचाव करा! ही धोकादायक लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

आकाश मुद्रा योग केल्याचे १४ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : गोष्ट खार, वेळ आणि अक्रोडची

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

Show comments