Biodata Maker marathi
✕

पायांसाठी काय करू?

Published: गुरूवार, 6 डिसेंबर 2012 (17:07 IST)
सौंदर्याच्या दृष्टीने सगळ्यात जास्त दुर्लक्ष नेहमी पायांकडेच केले जाते. याच कारणामुळे कदाचित मोजे-जोडे वापरून पाय झाकून घेण्याचा प्रयत्न होतो. पायांकडे होणारे दुर्लक्ष हे केवळ सौंदर्याच्याच दृष्टीने बाधक ठरते असे नाही, तर पायांच्या आरोग्यांच्या दृष्टीनेही ते घातक ठरते.

पाय हा देखील शरीराचा एक अनिवार्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे आणि जितकी काळजी आपण शरीराच्या इतर भागांची घेतो, तेवढीच काळजी आपण रोजच्या रोज पायांकडे थोडेसे लक्ष पुरवले तरी ते पुरेसे असते. मुख्यत्वे पायांशी निगडीत समस्या असल्यास त्याकडे विशेष आणि ताबडतोब लक्ष द्यायलाच हवे. अनेक प्रकारच्या सवयींबुळे पायांचे विशेष नुकसान होऊ शकते. काही महत्त्वाच्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.

पादत्राण े
पायांची योग्य काळजी घेतांना सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे सुयोग्य पादत्राणांची निवड. पायांना सर्वाधिक त्रस्त करणारा प्रकार म्हणजे पायाच्या आकारानुरुप आणि आरामदायी नसलेली पादत्राणे. शक्यतो सॉफ्ट लेदर किंवा तस्सम मुलयम मटेरियलपासून बनवलेल्या पादत्राणांची निवड करावी. हार्ड लेदर किंवा टणक मटेरिलयपासून बनवलेली, ज्यामुळे पाय अवघडतात अशी पादत्राणे वापरू वापरू नये.

पायांसाठी जोडे खरेदी करताना नेहमी योग्य आकाराच्या जोड्यांची निवड करा. असे करताना जोड े घातल्यानंतर पायाची बोटे मोकळी हलायला हवीत, ती चेपली जायला नकोत.

WD
खूप उंच असलेल्या चपला वापरू नयेत. अशा चपला वापरताना बॉडी बॅलन्सिंग जमत नाही. त्यामुळे पायांना त्रास होऊ शकतो. वजनाने फार जड असलेल्या चपला वापरणे टाळावे. जोड्यांमुळे चालताना टाचेला योग्य आधार मिळायला हवा. जोडे काढल्यानंतर लगेच बंदिस्त कपाटामध्ये ठेवू नयेत. यामुळे जोड्यातील दमटपणा तसाच राहील आणि त्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होणार नाही. जोडे काढल्यानंतर किमान तासभर तरी मोकळ्या हवेत ठेवावेत.

आठवड्यातून किमान एकदा (सुट्टीच्या दिवशी) जोडे किंवा चपला थोड्या शॅम्पूच्या पाण्याने धुवून लगेच पुसून घ्यावे व उन्हामधे वाळवून घ्यावेत. अगदी बारीक, पेन्सील हिल्सच्या चपला वापरणे शक्यतो टाळावे. यामुळे पायाच्या मसल्सवरील ताण वाढून ते दुखावले जाण्याची शक्यता असते.

मोज े
प्रत्येकाचे स्वतंत्र मोजे असावेत. एकमेकांचे मोजे वापरल्याने त्वचारोगांचा प्रसार होऊ शकतो.
मोज्यांची निवड करतानाही थोडे चिकित्सक असायला हवे. खूप घट्‍ट इलॅस्टीक असलेले मोजे वापरणे शक्यतो टाळा.
सिंथेटिक धाग्यांपासून तयार होणारे मोजे आकर्षक जरी दिसत असले तरी घाम शोषून घेण्याचे कार्य ते करू शकत नाहीत. शिवाय सिंथेटिक मोजे वापरल्याने पायांना घाम येण्याचे प्रमाणही वाढते.
एक दिवस वापरलेले मोजे पुन्हा दुसर्‍या दिवशी वापरू नयेत. मोजे काढल्यानंतर स्वच्‍छ धुवून वाळवून घ्यावेत.
शक्य तितके साधे आणि कॉटनचे मोजे वापरण्याचा प्रयत्न करावा.
पायांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पादत्राणे आणि मेजो यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

Show comments